Maize crop failing due to lack of rain in Shiwar at Deola. esakal
नाशिक

Nashik Kharif Season Crisis: देवळा तालुक्यात खरीप हंगाम धोक्यात! पाऊस नसल्याने पिके करपण्यास सुरवात

सकाळ वृत्तसेवा

Nashik Kharif Season Crisis : शहर व तालुक्यात एक-दीड महिन्यापासून दमदार पाऊस नसल्याने आणि गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ऊन पडू लागल्याने खरीप हंगामातील पिके करपू लागली आहेत. पाऊस नसल्याने आधीच पिकांची वाढ खुंटलेली असताना आता त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे.

यामुळे खरीप हंगाम संकटात सापडल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. पुढील तीन ते चार दिवस अशीच परिस्थिती राहिली तर डोळ्यांदेखत पिके जळून जाणार आहे. (Nashik Kharif Season Crisis Kharif season in danger in Deola taluka Since there no rain crops begin to grow)

शहर व तालुक्यात नावाला रिमझिम पाऊस हजेरी लावत असल्याने जुलै महिन्यात देवळा तालुक्यात केवळ ८३.१ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. ३० हजार ३०० हेक्टर क्षेत्रापैकी २४ हजार ३९४ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली असली तरी पाऊस नसल्याने ही पिके धोक्यात सापडली आहेत.

पावसाचे अंदाजही फोल ठरत असल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. नद्या-नाले, छोटी-मोठी धरणे यात पाणी नसल्याने विहिरींची पाणीपातळी कमी झाली आहे. ‘धोंड्या धोंड्या पाणी दे’ अशी आळवणी करूनही पाऊस पडत नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

टंचाईचे सावट

तालुक्यात सद्यःस्थितीत काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणू लागले आहे. त्यात गिरणारे, कुंभार्डे, कापशी, शेरी या गावांना सहा विहिरींचे अधिग्रहण करत चार टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे.

पावसाने अशीच ओढ दिली तर टँकरच्या संख्येत वाढ होणार असल्याने चणकापूर उजव्या कालव्याद्वारे रामेश्वर धरणात पाणी सोडण्यात आले आहे. मात्र त्यास मोठ्या प्रमाणात गळती असल्याने फारच कमी पाणी धरणात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT