Maize Crop  esakal
नाशिक

Kharif Season : खरिपाची पेरणी पूर्ण मात्र पाऊस अपूर्णच! येवल्यात सरासरी ओलांडली, पिके जगली पण जोरदार पावसाची गरज

Nashik News : पावसामुळे खरिपाची पेरणी मार्गी लागली असून पिके वाचल्याचे समाधान आहे. अवर्षणप्रवण असलेल्या तालुक्यात पावसाचा असमतोलपणा येथील शेतकऱ्यांसाठी तापदायक ठरत असतो.

सकाळ वृत्तसेवा

येवला : मागील वर्षाचा खरीप पूर्ण वाया गेल्याने यंदा पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना अजूनही मुसळधार पावसाचे दर्शन नाही. नदी, नाले, विहिरी, बंधारे कोरडेठाक आहेत. अधूनमधून येणाऱ्या पावसाने जूनची सरासरी ओलांडली असली तरी हा पाऊस कागदावरच असून प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. (Kharif sowing is complete but heavy rains needed)

पावसामुळे खरिपाची पेरणी मार्गी लागली असून पिके वाचल्याचे समाधान आहे. अवर्षणप्रवण असलेल्या तालुक्यात पावसाचा असमतोलपणा येथील शेतकऱ्यांसाठी तापदायक ठरत असतो. भौगोलिक दृष्ट्या चार भागात तालुका विभागला असल्याने पाऊसही विषम प्रमाणातच होतो. काही भागात चांगला तर काही भागात अत्यल्प पाऊस झाला.

कुठे ९ वेळेस तर कुठे १३ मिमी पाऊस झाला आहे. जलस्रोत कोरडेठाक असल्याने अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा अद्याप सुरू आहे. शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी पूर्ण केली असून सर्वच पिके उगवली आहे. पिकांची वाढही होताना दिसत असली तरी गेल्या दोन वर्षापासून भूजल पातळी घटल्याने जमिनीची तहान भागेल असा पाऊस अद्याप पडला नसल्याची परिस्थिती आहे.

जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यातच पावसाने हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्या शंभर टक्के होऊन पुढे गेल्याने दुबार पेरणीचे संकट नसले तरी खरीप हंगामाच्या भविष्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. लाल कांद्याच्या लागवडीसाठी रोपे घेण्याची शेतकऱ्यांची तयारी असून त्यासाठी पावसाची प्रतीक्षा आहे. (latest marathi news)

अवर्षण प्रमाण तालुका असल्याने पूर्ण पावसाळ्यातील येथील पर्जन्याची सरासरी ५३५ मिलिमीटरच्या आसपास आहे. तालुक्याची पर्जन्याची जून महिन्याची सरासरी १०३ मिलिमीटर असून आत्तापर्यंत १३१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी आतापर्यंत केवळ ४४ मिनिटे पाऊस होता. दहा-वीस मिनिटे जरी पाऊस पडला तरी पावसाची नोंद वाढते.

प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते हे आत्ताच्या आकडेवारीवरूनही लक्षात येते. आहे. तालुक्यात ६ मंडळात सरासरी ओलांडली आहे. तर सावरगाव व राजापूर मंडळात सर्वात कमी पाऊस झाल्याची नोंद आहे. तालुक्यात सावरगाव,खिर्डीसाठे डोंगरगाव येथे मोठे क्षमतेचे साठवण प्रकल्प आहेत. गावोगावी दोनशेहून अधिक बंधारे आहेत. या सर्वच साठ्यांना पावसाची प्रतीक्षा पाण्याची प्रतीक्षा आहे.

मंडळनिहाय असा पडला पाऊस (मिमीमध्ये)

येवला - ११२

नगरसूल - १५४

अंदरसूल - १३४

पाटोदा - १७५

सावरगाव - ९८

जळगाव नेऊर - १४०

अंगणगाव - १४८

राजापूर - ८५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khanapur Assembly Election 2024 Results : सुहास बाबर यांना विक्रमी 27 हजाराचे मताधिक्य; तानाजीराव पाटील ठरले किंगमेकर!

Wani Assembly Election Results 2024 : वणी मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटली! संजय देरकरांचा दणक्यात विजय

Raju Navghare Won Wasmat Assembly Election 2024 Result : दुरंगी लढतीत राजू नवघरे विजयी; जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव

Aurangabad West Assembly Election 2024 Result Live: शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत संजय शिरसाटांनी राखला गड

Mahesh Choughule Won in Bhiwandi West Assembly Election : भिवंडी पश्चिम मतदार संघावर तिसऱ्यांदा भाजपचा झेंडा; महेश चौघुलेंची बाजी

SCROLL FOR NEXT