Chief Minister Employment Scheme esakal
नाशिक

Chief Minister Employment Scheme : मुख्यमंत्री रोजगार योजना कार्यक्रमात कोल्हापूर प्रथम; नाशिक जिल्हा राज्यात दुसरा

सकाळ वृत्तसेवा

Chief Minister Employment Scheme : मुख्यमंत्री रोजगार योजना कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला असून, नाशिक जिल्हा उद्योग केंद्राने या वर्षीही ९३.३२ टक्के उद्दिष्ट मार्च २०२४ अखेर पूर्ण करत राज्यात दुसरा क्रमांक राखला आहे. यामध्ये २० कोटी ९४ लाख ३२ हजार रुपये अनुदानाचा लाभ उद्योगांना देण्यात आला आहे. उद्योग विकास विभागाने राज्यात उद्योग व छोटे व्यवसाय वाढवून रोजगारनिर्मितीकडे विशेष लक्ष देण्याचे धोरण तयार केले आहे. (nashik Kolhapur 1st and Nashik District 2nd in state in Chief Minister Employment Scheme Program marathi news)

यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत व उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंग कुशवाह यांनी यासाठी राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील उद्योग केंद्रांतील महाव्यवस्थापकांना याचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री रोजगार योजना कार्यक्रमांतर्गत प्रकरण मंजुरीसाठी व त्या उद्योगांना अनुदान मिळण्यासाठी व ते पुढे अविरत सुरू ठेवण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणीसाठी विशेष लक्ष ठेवण्याच्याही सूचना दिल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यात अलीकडे सातपूर, अंबडलगत असलेल्या औद्योगिक वसाहतीसह सिन्नर, दिंडोरी, मालेगाव, अंजग, गोंदे, वाडीवर्हे, चांदवड, सटाणा, येवला, मनमाड आदी भागात नवऔद्योगिक वसाहती स्थापन होत आहेत. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर नंतर औद्योगिक दृष्टीने सर्वांत वेगाने वाढणारे नाशिक हे शहर गणले जात आहे. यामुळे नवउद्योग वाढण्याचे प्रमाणही वाढत आहे. (latest marathi news)

गेल्या आर्थिक वर्षात उद्योग विकास विभागाने नाशिक जिल्ह्याला ९२६ प्रकरणाचे उद्दिष्ट जिल्हा उद्योग केंद्राला दिले होते. केंद्रामार्फत तीन हजार ३४३ प्रकरणे बँकांकडे दाखल करण्यात आले. त्यापैकी ८६७ प्रकरणे बॅंकांनी मंजूर केले. त्यासाठी तीन हजार ९४० कोटी ५१ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. दिलेल्या उद्दिष्टांपैकी ९३.३२ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. तसेच मार्जिंग मनी अनुदान वाटपमध्ये ३५९ उद्योगांना सुमारे २०९४.३२ लाख रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे.

''गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मुख्यमंत्री रोजगार योजनेंतर्गत उद्योग उभारण्यासाठी उद्दिष्टापेक्षा जास्त प्रस्ताव आपण दाखल करतो. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात नाशिक जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक राखला आहे. यासाठी उद्योग संघटनांसह बँका व इतर विभागाचे व जिल्हा उद्योग केंद्रातील अधिकारी, कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य मिळते.''- संदीप पाटील, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र नाशिक

अनुदान वाटप

१) कोल्हापूर - २९ कोटी दोन लाख ११ हजार

२) नाशिक - २० कोटी ९४ लाख ३२ हजार

३) अहमदनगर - २० कोटी २० लाख ११ हजार

४) पुणे - १६ कोटी ६१ लाख ८४ हजार

५) सातारा - १५ कोटी २७ लाख १६ हजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT