V. N. Naik Institution Election esakal
नाशिक

V. N. Naik Institution Election : सुटीमुळे आज प्रचाराचा ‘सुपर संडे’! सभासदांच्‍या घरी उमेदवारांची वर्दळ

Nashik News : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्‍थेच्‍या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्‍थेच्‍या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला आहे. यंदा चार पॅनल रिंगणात असल्‍याने सभासदांच्‍या घरी उमेदवारांची वर्दळ बघायला मिळते आहे. एक उमेदवार भेटून जातो न जातो तोच दुसरा येऊन धडकत असल्‍याचे चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळते आहे. (Naik Education Institute Election)

त्‍यातच येत्‍या आठवड्यात मतदान असल्‍याने रविवार (ता. २१) सुटीचा दिवस गाठताना जोरदार प्रचाराचे नियोजन पॅनलप्रमुखांनी आखल्‍याने खऱ्या अर्थाने सभासदांसाठी ‘सुपर संडे’ ठरेल. वैयक्‍तिक भेटींपासून सुरू झालेल्‍या प्रचाराचे आता सभा, बैठकांच्‍या स्वरूपात रूपांतर झाले आहे. गावोगावी फिरताना सभासदांच्‍या सभा घेतल्‍या जात असून, यासोबत त्‍यांच्‍या कुटुंबीयांच्‍या भेटी घेताना मतदानासाठी गळ घातली जाते आहे.

यंदा विक्रमी चार पॅनल निवडणूक रिंगणात असल्‍याने अनेक ठिकाणी प्रतिस्‍पर्धी पॅनलच्‍या उमेदवारांची एकमेकांसमोर गाठभेट होत आहे. सभासदांच्‍या घरी तर उमेदवारांची वर्दळ कायम बघायला मिळते आहे. एकतर इच्‍छुकांच्‍या भेटीदरम्‍यान संवाद किंवा फोनद्वारे संवाद सातत्‍याने सुरू असल्‍याचा अनुभव अनेक सभासदांना येतो आहे. (latest marathi news)

कुठलीही निवडणूक म्हटली, की रविवारच्‍या सुटीचा दिवस उमेदवारांसाठी पर्वणी ठरत असतो. या दिवशी नोकरदार वर्गाला सुटी राहात असल्‍याने बहुतांश कुटुंबातील सर्व सदस्‍यदेखील घरी भेटतात. नाईक शिक्षण संस्‍थेच्‍या निवडणुकीमध्येही रविवार (ता. २१) प्रचाराचा ‘सुपर संडे’ राहणार आहे. या दिवशी शक्तिप्रदर्शनासोबत बैठक, सभांचेही आयोजन पॅनलप्रमुखांनी आखले आहे.

‘ति’चा वाढता प्रतिसाद

प्रचारादरम्‍यान उमेदवारांच्‍या कुटुंबातील महिलावर्गदेखील सक्रिय झालेला असून, प्रचारदौऱ्यांमध्ये सहभाग वाढला आहे. प्रचारादरम्‍यान सभासदांच्‍या कुटुंबांना भेट देत महिला सदस्‍यांना मतदानासाठी गळ घालताना दिसून येत आहेत. या संवादात नातेसंबंधांची आवर्जून आठवण करून दिली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT