Kumbh Mela (file photo) esakal
नाशिक

Nashik Kumbh Mela : शाही मार्गाच्या दौऱ्यामुळे व्यावसायिकांमध्ये धस्स

Nashik News : २००३ मध्ये कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जुन्या शाही मार्गाचे रुंदीकरण केले जाणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : २००३ मध्ये कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जुन्या शाही मार्गाचे रुंदीकरण केले जाणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले. मात्र, अद्याप कारवाई झाली नसली तरी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने रस्ता रुंदीकरणाची चर्चा सुरू झाल्याने या भागातील व्यावसायिकांमध्ये भीती निर्माण झाली. (Road widening of Shahi Marga)

दरम्यान, आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी नागरिकांना बेघर करून उत्सव साजरा होऊ शकत नसल्याचे सांगताना गैरसोय न करता नियोजन करण्याच्या सूचना केल्या. २००३ मध्ये कुंभमेळ्यात जुन्या शाही मार्गावर सरदार चौक येथे चेंगराचेंगरी होऊन जवळपास ३२ लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे शासनाने चौकशी आयोग नियुक्त करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

२०१२-१३ मध्ये रमणी आयोगाने शासनाला अहवाल सादर केला. त्यामध्ये जुना शाही मार्ग अरुंद असल्याने ३० मीटर करण्याची सूचना करण्यात आली होती. रस्ता रुंदीकरण करण्यास स्थानिक वाडा मालक व दुकानदारांनी विरोध केला. जवळपास अठरा मीटर रस्ता रुंदीकरणांमध्ये वाडे व दुकाने तुटणार होती. स्थानिक नागरिकांची मागणी लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी विरोध केला होता.

२०१५-१६ मध्ये नवीन शाही मार्गावरून शाही मिरवणूक काढण्यात आली. आता आगामी सिंहस्थाच्या निमित्ताने पुन्हा एकदा शाही मार्ग चर्चेत आला आहे. महापालिका आयुक्तांनी प्रस्तावित कामांच्या स्थळांची पाहणी केली. या वेळी जुन्या शाही मार्गाची देखील पाहणी करणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर व्यावसायिकांमध्ये भीती निर्माण झाली. (latest marathi news)

"आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात स्थानिक नागरिकांची गैरसोय न होता नियोजन करणे गरजेचे आहे. अनेक वर्षांपासून या भागात नागरिक राहतात त्यांना बेघर करून उत्सव साजरा होऊ शकत नाही." - ॲड. राहुल ढिकले, आमदार.

"जुन्या शाही मार्गाच्या रुंदीकरणसंदर्भात फक्त चर्चा झाली आहे. यात किती मिळकती संपादित कराव्या लागतील, याबाबत चर्चा झाली मात्र अद्याप निर्णय झालेला नाही." - संजय अग्रवाल, शहर अभियंता, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT