Nashik News : सिन्नर शिर्डी महामार्गावरील वावी परिसरात रस्त्याच्या कामावरून घरी घेऊन चाललेल्या मजुरांच्या पिकअप वाहनाला अपघात होऊन एक महिला ठार तर २० मजूर गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. या वाहनांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त असल्याने मृत महिलेचे नाव लवकर समजू शकले नाही. (Laborer vehicle overturned accident 1 woman killed and 20 injured)
काही वेळाने मृत्यू पडलेल्या महिलेची ओळख पटवण्यात आली. त्या महिलेचे नाव मंदाबाई गोपिचंद उशिरे (६०) रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव असल्याचे निष्पन्न झाले. या महिला रोज रस्त्यावरचे काम करण्यासाठी कोळपेवाडी येथून येतात. दुभाजकांमध्ये लावलेल्या झाडांची गवत काढायचे व निगराणीचे काम त्या करतात. दररोज सकाळी त्या कोळपेवाडी येथून पाथरे व पाथरे येथून पिकअपने कामासाठी तालुक्यात जातात.
बुधवारीदेखील नेहमीप्रमाणे सिन्नर शिर्डी मार्गावर काम आटोपून परतत असताना वावी येथील रंगनाथ पा. गोडगे पब्लिक स्कूलसमोर सायंकाळी सहाच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप उलटली. वाहनात २० ते २२ महिला व तीन ते चार पुरुष होते. यातील मंदाबाई गोपिचंद उशिरे (६०) रा. कोळपेवाडी या महिलेचा मृत्यू झाला तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या. (latest marathi news)
त्यांना नाशिक येथे उपचारांसाठी हलविण्यात आले. १७ जखमी मजुरांवर सिन्नरच्या खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये गुड्डी कोळपे, हिराबाई गर्दे, वैष्णवी होंडे, दीपक शेळके, लताबाई बुरुंगले, सुनिता शिवदे, सरुबाई माळी ,अनुसया झांबरे, शिल्पा कोळपे संगीता शिवदे, सुरेखा कोळपे.
आदिनाथ इंगळे ,ललिताबाई शिवदे ,ऋषिकेश पिसाळ, सुमनबाई सूर्यवंशी ,अनिता भूतनर, वर्षा गायकवाड (सर्व रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव) यांचा समावेश आहे. दरम्यान, अपघातानंतर महामागांवर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.
वावी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पायमोडे. हवालदार बैरागी, शिंदे, इतर कर्मचान्यांनी वाहतुक सुरळीत केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत वावी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरु होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.