Water Scarcity esakal
नाशिक

Nashik Water Scarcity : सटाण्यातील पाणीटंचाईचे खापर प्रशासनावर; पुनंदच्या चारीचे काम सुरू

Nashik News : ऐन पावसाळ्यातील शहरातील कृत्रिम पाणीटंचाईला सटाणा नगर परिषद प्रशासनाचा हलगर्जीपणा व नियोजनाचा अभाव कारणीभूत.

सकाळ वृत्तसेवा

सटाणा : ऐन पावसाळ्यातील शहरातील कृत्रिम पाणीटंचाईला सटाणा नगर परिषद प्रशासनाचा हलगर्जीपणा व नियोजनाचा अभाव कारणीभूत असल्याचा आरोप करत पुनंद धरण कोरडे झाल्याने पाणीपुरवठा योजनेचे जॅकवेलसह मृतसाठ्यानजीक असलेले चारीचे काम युद्धपातळीवर करण्यात येत असल्याने भविष्यात शहराला कोणत्याही परिस्थितीत पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, असा विश्‍वास माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी व्यक्त केला. (Nashik News)

पुनंद पाणीपुरवठा योजनेवर प्रत्यक्ष भेट देऊन झालेल्या कामकाजाची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेत श्री. मोरे बोलत होते. ते म्हणाले, गत पाच वर्षांपासून टंचाईमुक्त असलेल्या शहरवासियांना ऐन पावसाळ्यात कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहेत. ही बाब अत्यंत वेदनादायी आहे. प्रशासनाने सुयोग्य नियोजन केले असते तर टंचाई निर्माण झाली नसती.

पाणीटंचाईची दखल घेत आपण सहकाऱ्यांसह तातडीने पुनंद पाणीपुरवठा योजनेवर स्पॉट व्हिजिट केली आहे. पुनंद धरणातील जलसाठा गेल्या अनेक वर्षापासून कमी होत नसल्याने जॅकवेलसह मृतसाठयापर्यंत काम करता येत नव्हते. मात्र सद्यस्थितीत धरण कोरडेठाक आहे. मृतसाठा शिल्लक असल्याने काही दिवसांपासून मृतसाठयापर्यंत योजनेचे काम पुढे सरकविण्यात यश आले आहे.

परिणामी ३५ फूट खोलवर चारी नेण्यात आली आहे. जॅकवेलचे देखील काम या काळात पूर्णत्वास नेण्यात येत आहे. यामुळे मृतसाठयातील पाणी जॅकवेलमधुन आपणास उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नजीकच्या काळासह भविष्यातील पन्नास वर्षात शहरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही.

पुनंद पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास असून केवळ पुनंद येथे कर्मचारी निवास व संरक्षक भिंतीचे काम निधी अभावी ठप्प आहे. पाणीपुरवठा योजना प्रत्यक्षात कार्यान्वित देखील झालेली आहे. असेही श्री. मोरे यांनी सांगितले. माजी नगरसेवक व भाजपचे शहराध्यक्ष काकाजी सोनवणे, याचिकाकर्ते अ‍ॅड. दीपक सोनवणे, माजी नगरसेवक दीपक पाकळे, सामाजिक कार्यकर्ते दत्तू बैताडे, नाना मोरकर, हेमंत भदाणे, हर्षवर्धन सोनवणे, विलास दंडगव्हाळ आदी उपस्थित होते. (latest marathi news)

जुन्या योजनेकडे प्रशासनाचे दुर्लक्षच ः सोनवणे

सटाणा : पुनंद पाणीपुरवठा योजनेच्या भरवशावर ऐन पावसाळ्यात शहरवासीयांवर पाणीबाणीची वेळ आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या सक्षम अशा पाणीपुरवठा योजनांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले म्हणून यास पालिका प्रशासनच जबाबदार आहे असा घणाघाती आरोप पालिकेचे माजी पाणीपुरवठा सभापती व शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख अरविंद सोनवणे यांनी केला आहे.

श्री सोनवणे म्हणाले, पुनंद योजनेच्या निर्मितीपूर्वी सटाणा शहराला गिरणा पात्रातून एक दिवसाआड सुरळीत व मुबलक पाणीपुरवठा केला जात होता. शहराचे विस्तारीकरण व लोकसंख्या वाढीमुळे काही वर्षांपूर्वीच करोडो रूपये खर्चून गिरणा पात्रात उद्भव विहीरी खोदल्या गेल्या त्यावर महागडे पंप बसवून शहराला योग्य दाबाने पाणी पुरवठा केला जात होता.

अशातच पुनंद योजना अस्तित्वात आली आणि शहर वासीयांच्या पाणी प्रश्न मिटणार म्हणून आशा पल्लवीत झाल्या. ५५ कोटी रूपये खर्च करून घिसाडघाईने पुनंद योजनेचे काम पुर्ण करण्याचा आटापिटा केला. टेस्टिंगच्या नावाने योजनेचे जलपूजनही आटोपले. शहरवासियांना सुरळीत व पूर्ण दाबाने पुनंदचे पाणी मिळू शकले नाही ही शोकांतिका आहे.

पुनद योजना सुरू झाल्यानंतर पर्यायी योजना म्हणून गिरणा नदी पात्रातील जुन्या योजनेकडे पालिका प्रशासनाने थेट दुर्लक्ष करून कानाडोळा केल्यामुळे जुन्या योजना नादुरुस्त झाल्या. पुनद धरणातील पाणीसाठा संपला तर जुन्या विहीरींमधील पाणी शहराला देता येईल याचा विसरच पालिका प्रशासनाला पडल्यामुळे आज पुनंद धरणात पाणीसाठा शिल्लक नाही आणि गिरणा नदी पात्रातील विहीरीवरील मोटारींची दुरुस्ती व देखभाल न झाल्यामुळे विहीरीमध्ये पाणी असतांनाही तीन दिवसाआड पाणी पुरवठा ही शहरवासीयांची शोकांतिका आहे.

आजही जुन्या योजनेच्या गिरणा पात्रातील एका उदभव विहीरीतून दररोज ५० लाख लिटर पाणी उपलब्ध होऊ शकते. त्यातून शहर वासीयांची तहान निश्चित भागू शकते. मात्र पालिका प्रशासनाने पुनंद योजनेच्या भरवशावर जुन्या गिरणा नदी पात्रातील पाणीपुरवठा योजना मोडीत काढल्याने शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

पालिका प्रशासनाने फक्त पुनद योजनेवर अवलंबून न राहता गिरणा नदी पात्रातील जुन्या योजनांचीही नियमित देखभाल दुरूस्ती करून पर्यायी व्यवस्था जपून ठेवावी अशी मागणीही सोनवणे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT