Stagnant water on industrial estate roads. esakal
नाशिक

Nashik Unseasonal Rain : पावसाने अंबड औद्योगिक वसाहतीची दैना; ड्रेनेज नसल्याने रस्त्यावर पाणीच पाणी

सकाळ वृत्तसेवा

सातपूर : अवकाळी पावसाने अंबड औद्योगिक वसाहतीची अक्षरशः दैना उडाली असून, एच सेक्टरमधील रस्त्यावर पाणीच पाणी होते. वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक उद्योगांचे उत्पादन काही काळासाठी बंद करण्यात आले होते. (lack of drainage in Ambad Industrial Colony)

सातपूर, अंबडसह जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहती पावसाळी गटार अथवा ड्रेनेज लाइन नसल्याने उद्योजकांसह कामगारवर्गाला अनेक समस्यांतून जावे लागत आहे. पावसाळ्यात अनेक कंपन्यांत पाणी शिरून नुकसान झाल्याच्या घटना वाढल्या आहेत.

औद्योगिक वसाहतीत ड्रेनेज लाइन नसल्याने सर्व पाणी रस्त्यावर वाहत असते. एच सेक्टर व नाल्याजवळच्या कंपन्यांमध्ये पाणी घुसते. (latest marathi news)

आज झालेल्या वादळी पावसामुळे औद्योगिक वसाहतीत दोन झाडे पडलली. किमान तासभर वीज गेल्याने अनेक कंपन्यांमधील उत्पादन बंद होते.

यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. संबंधित घटनेचा विचार करून प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी आयमातर्फे करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT