Depleted water bodies esakal
नाशिक

Nashik News : पावसाच्या माहेरघरीही वरुणराजाची पाठ; दारणा धरणात 3.64 ,मुकणेत 2.54

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पावसाळा सुरु होऊन आणि जून महीणा संपत आला तरी, पावसाचे माहेरघर असणाऱ्या तालुक्यात जोरदार पाऊस झाला नसल्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील धरणसाठ्यात घट झाली आहे. जिल्ह्यातील १७ मध्यम,७ मोठ्या अशा एकूण २४ प्रकल्पांत अवघा ५.६३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. जून महिन्याचे फक्त आठच दिवस शिल्लक राहीले असून तालुक्यात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. पाऊस लांबल्यास उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. जिल्ह्यातील धरणांतील अल्प उपयुक्त पाणीसाठ्यावर पुढील महिन्यांची भिस्त अवलंबून आहे. ( lack of heavy rainfall in taluka rain reservoir in taluka )

धरणसाठा घटला

तालुक्यातील वाकीखापरी,भाम, त्रिंगलवाडी ही धरणे कोरडीठाक पडली असून दारणा धरणात ३.६४ तर मुकणे धरणात २.५४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे तालुक्यात जोरदार पावसाची प्रतिक्षा लागली आहे. उर्वरीत धरणांत अत्यंत अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहील्याने पाणी टंचाईचे संकट गडद होत चालले आहे. गतवर्षी आजच्या दिवसापर्यंत १९.४९ टक्के पाणीसाठा होता.

तर यंदा शून्य ते पाच टक्क्यांपर्यंत येउन पोहोचला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात १६.५७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी ३०.०८ जलसाठा शिल्लक होता.गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी प्रमाणात शिल्लक असला तरी पाऊस लांबल्यास शहराला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. (latest marathi news)

गावे तहानलेलीच

टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. यंदा तापमानाच्या पाऱ्याने चाळिशीचा आकडा पार केल्यानेच ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तीव्रता वाढुन पाणी बाणी उभी राहीली आहे. पुढील काळातील तहान भागवण्याचे जिल्हा प्रशासनासमोर कडवे आव्हान आहे.

तालुक्यातील धरणांतील पाणीसाठा :

दारणा : ३.६४ टक्के,भावली : १.३० टक्के, मुकणे : २.५४ टक्के,वालदेवी : ०० टक्के, कडवा : ६.२८ टक्के,भाम : ०० टक्के ,वाकी : ०० तर गंगापुर धरणात १६.५७ टक्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT