Nashik News : पिंपळगाव खांब येथील वालदेवी नदीच्या घाटाजवळ बांधलेल्या बंधाऱ्यात शनिवारी (ता. ८) लाखो मासे मृतावस्थेत आढळून आले. याबाबत सर्वप्रथम वृत्त ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर सोमवारी (ता.१०) मनपा आरोग्य विभाग ॲक्शन मोडमध्ये आला. सकाळपासून साहित्यासह १५ जणांच्या पथकाने बंधाऱ्यातून मृत मासे गोळा करण्यास सुरवात केली. संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरल्याने ग्रामस्थ मात्र हैराण झाले आहेत. (Nashik Health Department)
शनिवारी स्थानिक ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे देवळाली अध्यक्ष सोमनाथ बोराडे आणि माजी नगरसेवक भगवान दोंदे यांना याबाबत माहिती दिली. मात्र रविवार सुटी आल्याने महापालिकेने याची दखल घेतली नाही. सोमवारी सकाळी बोराडे यांनी सिडकोच्या विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्याशी संपर्क साधला.
त्यावर त्यांनी या बाबत कारवाईला सुरवात करण्यात आली असून, आज हे मासे येथून जमा केले जातील असे सांगितले. सकाळी नऊपासून महापालिकेचे हे पथक बोटीद्वारे या बंधाऱ्यात खोलवर जाऊन मासे जमा करत होते. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने हे मासे मृत कसे झाले, याची चौकशी करण्याची मागणी पुन्हा एकदा ग्रामस्थांतर्फे बोराडे यांनी केली आहे. (latest marathi news)
एकाच ठिकाणी एवढे मासे मृत आढळून आले आहेत. इतरत्र मात्र असा प्रकार नजरेस आलेला नसल्याने पथकातील काही जाणकारांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. एकतर पाण्यात वीज प्रवाह सोडून किंवा विषारी पदार्थ खाऊ घालून हे मासे मृत केले असतील, अशी शंका सर्वत्र व्यक्त होत आहे. याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान खत प्रकल्पातून येणाऱ्या दूषित पाण्यामुळे मासे मृत झाले की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र सध्या खत प्रकल्पातून या प्रकारचे दूषित पाणीदेखील बाहेर येत नसल्याचे तेथे व्यवस्था बघणाऱ्यानी स्पष्ट केले आहे. सर्वप्रथम या गंभीर प्रश्नाला ‘सकाळ’ ने वाचा फोडल्याबद्दल ग्रामस्थांनी आभार मानले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.