लासलगाव : येथील सरपंच निवड प्रक्रिया लांबल्याने ग्रामपंचायतीची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर झाला असून, याकडे गांभीर्याने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे. (Nashik Lasalgaon Gram Panchayat financial condition marathi news)
लासलगाव सरपंच निवड प्रक्रिया सुरू झाली. तथापि, दोन्ही गटांनी कटशहाच्या राजकारण करून न्यायालयातून स्थगिती मिळविली होती. त्याचा परिणाम या प्रक्रियेला अंतिम स्थगिती मिळाली. त्याचा अंतिम निकाल २२ फेब्रुवारीला येणार होता, पण पुढील तारीख मिळेपर्यंत नवीन सरपंच निवड सहीचे अधिकार व नवीन आलेले ग्रामविकास अधिकारी यांच्या बँकेतील सह्यांचे नमुन्यामुळे ग्रामपंचायतीचे गावगाडर मंदगतीने सुरू आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे थकीत वेतन, कचरा गाड्यांसाठी डिझेलसाठी पैसे, दैनंदिन सर्व बाबी ठप्प झाल्या असून, ग्रामपंचायत प्रशासनाला काम करणे जिकरीचे झाले आहे. महावितरण कंपनीने वीजबिलाच्या थकबाकीपोटी १६ गाव पाणीपुरवठा योजनेच्या वीजपुरवठा खंडित केला आहे.
काही अटी व शर्तीवर गुरुवार (ता. २९)पर्यंत थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा अंतिम थकबाकी भरेपर्यंत सुरू होणार नाही. त्यामुळे लासलगावसह १६ गाव पाणीपुरवठा होणाऱ्या लाभार्थी गावांवर भीषण पाणीटंचाईचे संकट येऊ शकते. (Latest Marathi News)
मोठी थकबाकी ग्रामपंचायतीची डोकेदुखी
१६ गाव पाणीपुरवठा थकबाकी भरण्यासाठी लासलगाव ग्रामपंचायतीच्या नागरिकांकडून घरपट्टी, पाणीपट्टी व जागा भाडे गेल्या काही वर्षांपासून न भरल्याने ही मोठी समस्या निर्माण झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून लासलगाव ग्रामपंचायतीची घरपट्टी एक कोटी, ६६ लाख, पाणीपट्टी एक कोटी, ४७ लाख व जागा भाडे ७८ लाख थकले आहेत.
एवढी मोठी प्रचंड थकबाकी वसूल करण्यासाठी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी अंतिम नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे वसुली काही प्रमाणात वाढली आहे. कोणत्याही परिस्थितीत थकबाकी न भरल्यास दोन-तीन दिवसांत कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे नागरिकांचेही धाबे दणाणले आहे.
यासंदर्भात ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम यांनी नागरिकांना आपल्याकडील कोणत्याही प्रकारची थकबाकी असेल, ती न भरल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कटुता टाळण्यासाठी ग्रामपंचायतीला सहकार्य करून आपल्याकडील थकबाकी त्वरित भरावी, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.