11th admission esakal
नाशिक

Junior Collage Admission : अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी उद्यापासून; अर्जांची आज अखेरची संधी

Collage Admission : अकरावीच्या ऑनलाइन केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दुसऱ्या नियमित फेरीत दोन हजार ३७० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Junior Collage Admission : अकरावीच्या ऑनलाइन केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दुसऱ्या नियमित फेरीत दोन हजार ३७० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. चार हजार ८९५ विद्यार्थ्यांची निवड झालेली असताना, उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शनिवारी (ता. १३) अखेरची मुदत असेल. दरम्‍यान, तिसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले असून, रविवार (ता. १४) पासून प्रवेशप्रक्रियेला सुरवात होईल. अकरावीचे अद्याप केवळ साडेआठ हजार जागांवर प्रवेश झाले आहेत. ( last chance to apply for Junior College Admission Class XI )

अद्यापही मोठ्या प्रमाणात जागा रिक्‍त आहेत. दरम्‍यान, यापूर्वी पहिल्‍या फेरीत सहा हजार ५७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. दुसऱ्या फेरीत निवड झालेल्‍या चार हजार ८९५ पैकी दोन हजार ३७० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. या फेरीत प्रवेशाची शेवटची मुदत शनिवारी संपेल. सर्वाधिक तीन हजार ८४७ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत, तीन हजार ४८ विद्यार्थ्यांनी वाणिज्‍य शाखेत, तर एक हजार ३८८ विद्यार्थ्यांनी प्रवेश फेरीतून आपले प्रवेश निश्‍चित केले आहेत. अद्यापही ६६ टक्‍के जागा रिक्‍त असून, पुढील प्रक्रियेत प्रवेशास कशा स्वरूपात प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष लागून राहणार आहे. (latest marathi news)

तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक

अर्जाचा भाग एक, भाग दोन भरणे ः १४ ते १७ जुलै

महितीच्‍या प्रक्रियेसाठी राखीव मुदत ः १८ व १९ जुलै

तिसऱ्या फेरीची निवड यादीची प्रसिद्धी ः २२ जुलै

यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची मुदत ः २२ ते २४ जुलै

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT