railway line between Manmad Jalgaon esakal
नाशिक

Nashik News : मनमाड- जळगाव दरम्यानच्या चौथ्या रेल्वेलाईनला चालना!

Nashik : मनमाड ते जळगावदरम्यान मध्य रेल्वेतर्फे चौथी लाईन टाकण्याच्या कामाला चालना मिळाली आहे.

संजीव निकम

Nashik News : मनमाड ते जळगावदरम्यान मध्य रेल्वेतर्फे चौथी लाईन टाकण्याच्या कामाला चालना मिळाली आहे. या मार्गासाठी तालुक्यातील नागापूर, पानेवाडी, हिसवळ खुर्द, मांडवड, आझादनगर, क्रांतीनगर, नांदगाव ग्रामीण, गंगाधरी, डॉक्टरवाडी, बाभूळवाडी, जळगाव खुर्द, पिंपरखेड, परधाडे व न्यायडोंगरी आदी १४ ठिकाणी भूसंपादन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने जागानिश्चितीची मागणी केली आहे. (Launch of fourth railway line between Manmad Jalgaon )

अलीकडेच मनमाड ते जळगावदरम्यान तिसऱ्या ट्रॅकचे बहुतांश काम पूर्णत्वाकडे आले असताना चौथा लोहमार्ग टाकण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे रेल्वेची फ्रिक्वेन्सी वाढून वाहतूक व्यवस्थेत सुधार होऊन गाड्यांची गती वाढेल. वाहतुकीचा खोळंबा दूर होण्यास मदत होणार आहे. मनमाड ते जळगावदरम्यान अगोदरच तिसऱ्या लाईनचे काम जवळपास पूर्णत्वाकडे जात असून, या मार्गातील ३०४ लहान व २२ ठिकाणी मोठे पूल उभारणीचे कामही सुरू आहे. (latest marathi news)

या मार्गावर दररोज ११८ हून अधिक मेल एक्स्प्रेस व ४८ हून अधिक मालवाहू गाड्या धावत असतात. तिसरा मार्ग पूर्णत्वाकडे जात असताना चौथा लोहमार्ग व्हावा, यासाठी करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणासाठी रेल्वेने दरवर्षी एक कोटी रुपयांची तरतूद केली. आता सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यावर भूसंपादन करण्याचे निश्चित झाल्याने भुसावळ मंडळात नजीकच्या काळात नव्या गाड्या सुरू होण्याला पूरक ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Voting: पिपाणीने पुन्हा केला तुतारीचा गेम! वळसे पाटील थोडक्यात वाचले; पवारांच्या ९ बड्या नेत्यांना कसा बसला फटका?

Mobile Charging Tips : कितीही वेळ मोबाईल वापरा चार्जिंग संपणारच नाही, सोपी ट्रिक बघाच

Devendra Fadanvis: ‘महाराष्ट्र नायक’ फडणवीसांनाच मुख्यमंत्री करा, भाजपची जोरदार Lobbying

Utpanna Ekadashi 2024: 26 कि 27 नोव्हेंबर कधी साजरी केली जाणार उत्पन्न एकादशी? जाणून घ्या काय करावे अन् काय नाही

Latest Maharashtra News Updates : सत्तास्थापनेनंतर पहिलाच निर्णय 'लाडकी बहिणीं'चे पैसे वाढवणार?

SCROLL FOR NEXT