Nashik News : दिंडोरी रोडवरील जलशुद्धीकरण केंद्रातून जलकुंभाला पाणीपुरवठा वितरण करणाऱ्या जलवाहिनीला गेल्या काही दिवसांपासून गळती लागली आहे. या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र आहे. डाव्या तट कालव्यालगत असलेल्या झोपडपट्टी भागातील महिला यात पाणी भरताना दिसत आहे. या पाणी गळतीकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे. ( leak in aqueduct that supplies water to aquifer at dindori road )
याकडे पंचवटी विभागाच्या पाणीपुरवठा विभागाने लक्ष घालून पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. आगामी काळात पाण्याचे संकट उभे राहण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. त्यासाठी पाण्याचा अपव्यय करू नका, पाणी जपून वापरा असा संदेश दिला जात आहे. तर दुसरीकडे मात्र पाणीपुरवठा विभाग जलकुंभाला पाणी वितरित होणाऱ्या पाइपलाइनला लागलेली गळतीमुळे पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र आहे.
जलकुंभाला पाणी वितरण करणाऱ्या जलवाहिनीतून दैनंदिन दिवसभरात हजारो लिटर पिण्याच्या पाण्याची गळती होत आहे. नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पेठ रोड व दिंडोरी रोडवरील गंगापूर डावा कालव्याच्या जवळ मनपा पाणीपुरवठा विभागाची जलवाहिनी जोडली दिसते. (latest marathi news)
जलवाहिनीतून दिंडोरी रोड व पेठ रोड परिसरात असलेल्या जलकुंभाला पाणी वितरण केले जाते. मात्र काही दिवसांपासून या जलवाहिनीतून पाण्याचे फवारे उडून पाणी वाया जात असले तरी पाणीपुरवठा विभागाकडून दुरुस्ती काम केले जात नसल्याने दैनंदिन हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे.
गळतीच्या पाण्यावर गुजराण
गंगापूर डावा तट कालव्यालगत झोपडपट्टी आहे. या परिसरातील रहिवासी महिला गळती होत असलेल्या जलवाहिनीतून उडत असलेले पाणी भरताना दिसत आहे. नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत काही वर्षापूर्वी स्लम भागामध्ये अल्प दरात नवीन नळ कनेक्शन योजना राबविण्यात आली होती. तरीदेखील कालव्या लगत राहणारे रहिवासी या गळती होत असलेल्या जलवाहिनीतून पाणी भरताना दिसत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.