Nashik Law Course Admission : विधी शाखेतील अभ्यासक्रमांना ‘अच्छे दिन’ आले असून, विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये जिल्ह्यातील अकराशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एलएल.बी. अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. यात मुलांप्रमाणे मुलींचेही प्रमाण लक्षणीय आहे. ( Law course seats full admission)
विधी शाखेतील अभ्यासक्रम एलएल.बी.मध्ये तीन वर्षे व पाच वर्षे कालावधीचे असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. यात पाच वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमास प्रवेशासाठी इयत्ता बारावीपर्यंतची शैक्षणिक अर्हता आहे; तर तीन वर्षे एलएल.बी.च्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पदवीनंतर प्रवेश संधी उपलब्ध असते. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलतर्फे प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती.
या परीक्षांचा निकाल जाहीर करीत प्रवेश फेऱ्यांची प्रक्रियाही नुकतीच पार पडली. प्राप्त आकडेवारीनुसार दोन्ही अभ्यासक्रम मिळून नाशिक जिल्ह्यात अकराशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एलएल.बी.च्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे. रिक्त जागांची संख्या शंभरपेक्षा कमी आहे. तीन-चार वर्षांत प्रवेशासाठी विधी शाखेकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असल्याचे निरीक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले.
प्रवेशासाठी व्यवस्थापनाचा प्रयत्न
सीईटी परीक्षेत कमी पर्सेंटाईल मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी व्यवस्थापन कोट्याच्या जागांवर प्रवेशासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे गेला महिनाभर विधी महाविद्यालयांत विद्यार्थी, पालकांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती. प्रवेशप्रक्रियेच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रवेशासाठी घाम गाळत असलेल्या विद्यार्थ्यांचे दृश्य पाहायला मिळाले. (latest marathi news)
जिल्ह्यातील प्रवेशाची आकडेवारी
एलएल.बी. (३ वर्षे कालावधी)-
- प्रवेशासाठी उपलब्ध जागा- ७८६
- प्रवेश घेतलेले विद्यार्थी- ७७६
एलएल.बी. (५ वर्षे कालावधी)-
- प्रवेशासाठी उपलब्ध जागा- ३९६
- प्रवेश घेतलेले विद्यार्थी- ३३०
"शासकीय, निमशासकीय, खासगी अशा सर्व क्षेत्रांत विधिज्ञांची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांमधील कौशल्ये व क्षमतेनुसार उत्पन्न मिळविण्याची संधी असते. ग्रामीण भागापासून मोठ्या शहरापर्यंत सर्व स्तरांवर रोजगार उपलब्ध होतो. स्वयंरोजगाराचे उत्तम साधन असल्याने तीन-चार वर्षांपासून विद्यार्थ्यांचा विधी अभ्यासक्रमांकडे कल वाढत आहे. यापुढेही प्रतिसाद वाढता राहील."- डॉ. संध्या गडाख, प्राचार्या, ‘मविप्र’ विधी महाविद्यालय
"नियमित विद्यार्थ्यांसह शिक्षणात खंड पडलेले अनेक विद्यार्थी विधी शाखेत प्रवेशासाठी उत्सुक असतात. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या टप्प्यांवर कायदेशीर सल्ल्याची आवश्यकता असते. त्यामुळे विधिज्ञांची मागणी वाढत असून, चांगला करिअरचा पर्याय म्हणून हे क्षेत्र नावारूपाला येत आहे."- डॉ. प्रफुल्ल चव्हाटे, प्राचार्य, नवजीवन विधी महाविद्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.