leopard caught in CCTV esakal
नाशिक

Nashik Leopard News : मखमलाबाद शिवारातील काकड मळ्यात बिबट्याचा धुमाकूळ; वासरावर केला हल्ला

Nashik News : शेतमळे परिसर असलेल्या मखमलाबाद परिसरात फॉरेस्ट नर्सरी जवळ काकड यांच्या गोठ्यातील वासरावर गुरुवार (ता.२६) रोजी रात्री बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : मखमलाबाद शिवारात बिबट्याचा वावर हा कायमच असून शेतकऱ्यांना ही बाब काही नवीन नाही. शेतमळे परिसर असलेल्या मखमलाबाद परिसरात फॉरेस्ट नर्सरी जवळ काकड यांच्या गोठ्यातील वासरावर गुरुवार (ता.२६) रोजी रात्री बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात वासरू ठार झाले आहे. (Leopard in kakad mala in Makhmalabad Shiwar)

ज्ञानेश्वर काकड मखमलाबाद शिवारातील फॉरेस्ट नर्सरीजवळ यांचा गोठा आहे. गुरुवारी ता.२५ रोजी बिबट्याने गोठ्यात असलेल्या वासरावर हल्ला केला. त्यानंतर त्या वासराला बिबट्या उचलून नेतानाचा व्हिडीओ गोठ्यात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सदर व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. मखमलाबाद शिवारात शेतमळे परिसर आहे. या भागात बिबट्याचा भक्ष्याच्या शोधात कायमच वावर असतो. काही महिन्यांपूर्वी याच भागात दोन बिबटे शेतात खुलेआम फिरत असल्याचा देखील व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. (latest marathi news)

यातच गुरुवार रोजी काकड यांच्या गोठ्यातील वासराचा बिबट्याने फडशा पडल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच भागात बिबट्याने एका गायीवर हल्ला चढविला असल्याची चर्चा असून वन विभागाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे असे नागरिकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore : 'रात्रीचे खेळ सांगायला आम्हाला भाग पाडू नका'; आमदार जयकुमार गोरेंचा कोणाला इशारा?

Latest Maharashtra News Updates :मनसेचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होणार

IND vs SA : आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात Axar Patel चा अफलातून कॅच; करून दिली ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची आठवण

BSNL IFTV : BSNLने सुरु केली पहिली इंट्रानेट टीव्ही सेवा; 500+ लाईव्ह चॅनेल्स अन् OTT प्लॅटफॉर्म्सचं कनेक्शन कसं घ्यायचं? वाचा

'उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी दगाबाजी केली अन् काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसले'; विनोद तावडेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT