Pune University esakal
नाशिक

Nashik News : खोट्या मंजुरी दाखवत टेंडर घोटाळा; पुणे विद्यापीठात व्‍यवस्‍थापन परिषद सदस्‍य वैद्य यांचा ‘लेटर बाँब’

Nashik : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या व्‍यवस्‍थापन परिषदेची मंजुरी नसतानाही खोट्या मंजुरी दाखवून टेंडर घोटाळा सुरू असल्‍याचा आरोप व्‍यवस्‍थापन परिषद सदस्‍य सागर वैद्य यांनी केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या व्‍यवस्‍थापन परिषदेची मंजुरी नसतानाही खोट्या मंजुरी दाखवून टेंडर घोटाळा सुरू असल्‍याचा आरोप व्‍यवस्‍थापन परिषद सदस्‍य सागर वैद्य यांनी केला आहे. यासंदर्भात कुलगुरूंना पत्र पाठविले आहे. कुलगुरूंना दिलेल्‍या पत्रात वैद्य यांनी म्‍हटले आहे, की मंगळवारी (ता. ३०) व्यवस्थापन परिषद सभेच्या कार्यक्रम पत्रिकेतील एका प्रस्तावात मेस्को संस्थेकडून १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीसाठी २२० सुरक्षारक्षक घेण्यासाठी नऊ कोटी ८२ लाख ४५ हजार रुपयांच्या खर्च मंजुरीचा प्रस्ताव ठेवला आहे. ( Letter Bomb by Vaidya Member of Management Council in Pune University )

या प्रस्तावासाठी आपण २७ फेब्रुवारीला व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिल्याचे म्हटले आहे. तशा ठरावाची प्रतही जोडली आहे. मात्र असा कुठलाही ठराव व्यवस्थापन परिषदेने मंजूर केलेला नसतानाही मंजुरी कशी दाखविण्यात आली, याबद्दल आमचा आक्षेप आहे. सुरक्षारक्षक भरतीचा प्रस्ताव सर्वप्रथम ६ मार्चच्या सभेत ऐनवेळचा प्रस्ताव म्हणून प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी ठेवला होता.

कोट्यवधींची आर्थिक जबाबदारी असल्याने ऐनवेळी दोन ओळीच्या ठरावाने मंजूर करणे योग्य नसल्याने हा प्रस्ताव रीतसर कायद्यानुसार अजेंड्यावर ठेवावा, असे ठरले होते. नंतर ९ मार्चच्या सभेत प्रस्ताव अजेंड्यावर आणला गेला. या वेळी महाराष्ट्र सुरक्षारक्षक मंडळ आणि मेस्को या कंपन्यांबद्दल पुन्हा वादग्रस्त चर्चा होऊन ठराव पुन्हा प्रलंबित ठेवण्याचा निर्णय सभेत झाला.

मंजूर न झालेला प्रस्ताव २७ फेब्रुवारीला मंजूर दाखविण्याचा बोगसपणा प्रशासनाने केला कसा, असा सवाल या पत्रात उपस्‍थित केला आहे. आचारसंहिता सुरू असल्याने विद्यार्थी शिक्षणहिताचे अनेक विषय प्रलंबित ठेवताना ‘बॅक डेटेड’ने व्यवस्थापन परिषेदेचे खोटे मंजुरी ठराव करत साडेनऊ कोटींचे काम देण्याचा उद्योग करण्यामागे कुणाचे हितसंबंध आहेत, असा सवालही उपस्‍थित केला आहे. (Latest Marathi News)

वर्षभरापासून उद्योग सुरू असल्‍याचा केला दावा

गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या विषयांत असेच बनावट प्रस्ताव बनवून उद्योग केले जात असल्‍याचा दावा पत्रात केला आहे. प्रशासनातील काहींच्या मर्जीतील ठेकेदारांना कामे मिळत आहे, असे लक्षात आल्याने निविदाप्रक्रिया न राबविता जुन्याच ठेकेदारांना मुदतवाढीच्या नावाखाली कोट्यवधींची कामे आणि बिल दिली गेली असल्‍याचा खळबळजनक आरोप केला आहे. अनेकदा आक्षेप नोंदवूनही कुठलीही कार्यवाही झालेली नाही. यामागे आर्थिक घोटाळे हितसंबंध असल्याच्या संशयाला बनावट मंजुरी प्रकरणामुळे बळ मिळाले आहे, असेही नमूद केले आहे.

...तर पोलिस, न्‍यायालयात दाद मागणार

वारंवार तक्रारी करूनही गैरप्रकार वाढतच आहे. यावर कुलगुरूंनी सविस्तर लेखी निवेदन सभेसमोर करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. अन्यथा आम्हाला कायदेशीर मार्गाने यासाठी लढाई करावी लागेल. कुलपती तथा राज्‍यपालांकडे किंवा प्रसंगी पोलिसांत, न्यायालयातही दाद मागावी लागेल, असे या पत्रात म्‍हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लबूशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT