Water is stored in earthen pots for animals and birds. esakal
नाशिक

Nashik news : पाणवठे, मातीच्या भांड्यातील पाणी पक्ष्यांसाठी संजीवनी; दुष्काळाची दाहकता

Nashik : दुष्काळामुळे गुरांना चारा व पाणी विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवलेली असताना वन्य प्राण्यांसाठी सामाजिक संघटनांनी पाणवठे तयार केले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik news : दुष्काळामुळे गुरांना चारा व पाणी विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवलेली असताना वन्य प्राण्यांसाठी सामाजिक संघटनांनी पाणवठे तयार केले आहेत. तर मातीच्या भांड्यातील पाणी पशू-पक्ष्यांसाठी संजिवनी ठरत आहे. पावसाअभावी धरणे कोरडी पडत चालली आहेत. मुख्य धरणांमध्ये पाणी दिसत असले तरी नद्या, नाल्यांना पाणीच राहिलेले नाही. त्यामुळे वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ()

नेहमीच्या जंगलात किंवा डोंगर दर्यांमध्ये राहणारे वन्यजीव पाण्याच्या दिशेने स्थलांतरित होत आहे. पण तेथील वातावरण त्यांना मानवत नसल्याने आपल्या मूळच्या ठिकाणीच प्राणी व पक्षी राहणे पसंत करतात. त्यांच्यासाठी पर्यावरणप्रेमी, सामाजिक संघटनांनी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाणवठे तयार केले आहेत.

पाणवठ्यात साठलेले पाणी वन्यप्राण्यांना संजीवनी ठरत आहे. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा होत असल्यामुळे वन्यप्राण्यांचे अतोनात हाल होत असल्याचे दिसून येते. पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.(latest marathi news)

''पक्ष्यांना पुरेल एवढे पाणी सहज उपलब्ध असल्यामुळे नांदुरमध्यमेश्‍वरला वेगवेगळे पक्षी दिसतात. काही दिवसांपूर्वी व्हाइट स्टार्क दिसला. सद्यस्थितीस पक्षांचे स्थलांतर झालेले नसले तरी प्रमाणही कमी झालेले नाही.''-गंगाधर आघाव, पक्षिमित्र

''पाणवठ्यांमुळे वन्यप्राणी वाचले आहेत. नदी, नाल्यांमध्ये पाणीच नसल्यामुळे पाणवठेच या प्राण्यांना संजीवनी देतात. दुष्काळग्रस्त भागातील प्राण्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. वनविभागाच्या उपाययोजना तोकड्या पडत असून, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे.''-राम खुर्दळ, गडकोट संवर्धन समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT