Nashik Sundar Narayan Temple esakal
नाशिक

Nashik Sundar Narayan Temple : सुंदरनारायण मंदिराच्या पुनर्बांधणीवर स्थानिकांचा आक्षेप!

Nashik News : पुरातत्त्व विभागातर्फे होळकर पुलालगतच्या प्राचीन सुंदरनारायण मंदिराच्या नूतनीकरणाचे दुसऱ्या टप्प्याचे काम सध्या सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सुंदरनारायण मंदिराच्या जुन्या दगडावर नवीन बांधकाम करीत असल्याचे वंशपरांपगत पौराहित्य करणारे अमेय पुजारी यांच्या निदर्शनास आले. त्यावर आक्षेप घेत त्यांनी सुपरवायझरला काम बंद करण्यास सांगितले. परंतु १५ दिवस उलटून दाद न मिळाल्याने त्याचबरोबर कंत्राटदाराला काम पूर्ण करण्याचे टार्गेट असल्याने मंदिराच्या पुनर्बांधणीवर पुजारी यांच्यासह स्थानिकांनी आक्षेप नोंदवत नाराजी व्यक्त केली. (Local object to reconstruction of Sundar narayan Temple)

पुरातत्त्व विभागातर्फे होळकर पुलालगतच्या प्राचीन सुंदरनारायण मंदिराच्या नूतनीकरणाचे दुसऱ्या टप्प्याचे काम सध्या सुरू आहे. जुन्या ठिसूळ झालेल्या दगडांवरच नवीन दगड बसवत असल्याने जुन्या दगडाच्या खपल्या निघत आहे. त्यात नवीन दगडाचा भार आल्यावर बांधकाम कितपत मजबूत राहील, अशी शंका स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

पुरातत्त्व विभागाकडे दाद मिळत नसल्याने व कंत्राटदाराला काम पूर्ण करण्याचे टार्गेट असल्याने मंदिराच्या पुनर्बांधणीवर स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कंत्राटदाराच्या आणखी चार साइटचे सुरू आहे. (latest marathi news)

त्यात लाच प्रकरणी अटक झालेल्या अधिकाऱ्यांमुळे विभागाचा अतिरिक्त कारभार हा सहाय्यक संचालक अमोल गोटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिकांच्या शंकाचे निरसन होत नसून दुर्लक्षित साइट असल्याचा आरोप स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहे.

"जुन्या दगडावर नवीन दगड न लावता नवीन दगड बांधकामासाठी वापरला जावा एवढीच माफक अपेक्षा आहे. जुने ठिसूळ झालेले दगड बांधकामासाठी वापरले जात असतील तर मंदिराचे आयुष्य कमी होईल. त्यासाठी सर्व खटाटोप सुरू आहे." - अमेय पुजारी, वंशपरंपरागत पुजारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT