Maha Vikas Aghadi candidate Rajabhau Waje chatting with activists, Mahayuti candidate Hemant Godse playing with his grandson after voting. esakal
नाशिक

Nashik News : काय चाललंय उमेदवारांचे? गोडसे रंगले नातवात, वाजे कार्यकर्त्यांच्या गराड्यात, बाबाजी करताय ‘थॅंक्यू

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गेल्या दीड, दोन महिन्यांपासून सातत्याने प्रचारात गुंतलेल्या नाशिक लोकसभेच्या उमेदवारांना मतदानानंतर उसंत मिळाली. उसंतीच्या त्या क्षणात महायुतीचे उमेदवार गोडसे यांनी नातवांसाठी थोडा वेळ काढला, तर महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे अद्यापही कार्यकर्त्यांच्या गराड्यात आहे. (Nashik Lok Sabha candidates engaged in campaigning incessantly got relaxed after polls)

अपक्ष शांतीगिरी महाराज नेहमीप्रमाणे पहाटे उठून कामाला लागले असून निकाल काहीही लागो, निवडणुकीत त्यांच्यासाठी झटलेल्यांना दिवसभर ‘थॅंक्यू‘ म्हणण्याची मोहीम राबविली. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील रणधुमाळी संपून मतदानदेखील पार पडले. मागील दीड ते दोन महिन्यांपासून प्रचाराची रणधुमाळी उडाली. महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे तर महायुतीकडून हेमंत गोडसे उमेदवार होते.

अपक्ष उमेदवार बाबाजी परिवाराचे शांतीगिरी महाराज यांनीदेखील निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमावले. हेमंत गोडसे यांना ऐनवेळी महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाली असली तरी आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असा ठाम विश्वास त्यांना होता. त्यामुळे सुरवातीपासूनच त्यांनी प्रचार सुरू केला.

इगतपुरी व सिन्नर मतदारसंघामध्ये त्यांची प्रचाराची एक फेरी झाली. प्रत्यक्षात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना प्रत्येक ठिकाणी जाता येत नसले तरी आधीच्या प्रचार फेरीमुळे ते मतदारांपर्यंत पोचले होते. गोडसे यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी ४५ दिवस अगोदर वाजे यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांनी पहिल्या दिवसापासून प्रचाराचा जोर धरला. प्रत्यक्ष भेटी गाठींवर त्यांनी जोर दिला. (latest marathi news)

शहरी भागात मुख्यत्वे त्यांचा प्रचाराकडे कल होता. शांतीगिरी महाराज यांनीदेखील अनुयायांसह नाशिक लोकसभा मतदारसंघातील कोपरा अन्‌ कोपरा पिंजून काढला. प्रचाराच्या कालावधीत उमेदवारांना कुटुंबासाठी वेळ देता आला नाही. शांतीगिरी महाराजांची मोहीम अनुयायांनीच चालवली. सकाळी उठल्यापासून सुरू झालेला प्रचार रात्री उशिरापर्यंत सुरू व्हायला.

प्रत्यक्ष गाठी-भेटी, फोनवरून बोलणे, बाहेरच जेवण करणे यामुळे दैनंदिन जीवनशैलीत बदल झाला. मतदान झाल्यानंतर मात्र सर्वच उमेदवार रिलॅक्स मूडमध्ये आले. महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आज दिवसभर सिन्नर येथील कार्यालयात कार्यकर्त्यांना भेटले व निवडणुकीतील बरोबरच भविष्यातील नियोजन केले. हेमंत गोडसे यांनी सकाळी कुटुंबातील सदस्यांना वेळ दिला, नातवांसोबत होते रमले. दुपारनंतर कार्यालयात बसून गाठीभेटी घेतल्या. शांतीगिरी महाराज निवडणुकीत ज्यांनी मदत केली त्यांना भेटले व त्यांचे आभार मानले.

"प्रचारामुळे कार्यकर्त्यांशी मनमोकळ्या गप्पा मारता आल्या नाही. आज दिवसभर कार्यालयात बसून त्यांना भेटलो, बोललो." - राजाभाऊ वाजे, उमेदवार, महाविकास आघाडी.

"प्रचारामुळे कुटुंबीयांना वेळ देता आला नाही. नातवांसोबत काही वेळ घालविल्याने समाधान वाटले." - हेमंत गोडसे, महायुतीचे उमेदवार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT