voter slip esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : मतपत्रिका 32 लाख 70 हजार मतदारांना घरपोच

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जनजागृती केली जात असताना मतदारांना घरोघरी मतपत्रिका वाटप सुरू केले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत १६ लाख ५० हजारांवर, तर दिंडोरीत १६ लाख २० हजारांवर मतदान स्लिपांचे वाटप पूर्ण झाले आहे. शनिवार (ता. १८)पर्यंत शंभर टक्के वाटप करण्याचे उद्दिष्ट निवडणूक विभागाने ठेवले आहे. (Nashik Lok Sabha Constituency)

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (ता. २०) मतदान होत आहे. २०१९ च्या निवडणुकीत नाशिक लोकसभेसाठी ६१, तर दिंडोरीत ६५ टक्के मतदान झाले होते. यंदा त्यापेक्षा अधिक मतदान व्हायला हवे म्हणून जिल्हा प्रशासनाने ‘स्वीप’ कार्यक्रमाच्या माध्यमातून गावोगावी जनजागृती केली.

शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल्स, सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यात आली. ‘स्वीप’साठी शासनाकडून अवघे दहा लाख रुपये प्राप्त झाल्यामुळे प्रशासनाला विविध संघटनांच्या मदतीने हा कार्यक्रम राबवावा लागला. विद्यार्थ्यांमध्ये रांगोळी, निबंध, मेंदी, सायकलिंग आशा स्वरूपाच्या स्पर्धाही घेण्यात आल्या. त्यातून पालकांपर्यंत माहिती पोचेल आणि आपल्या पाल्याच्या आग्रहास्तव ते मतदान करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

मतदान जनजागृतीसोबतच मतदारांना घरपोच मतदान स्लीप वाटप सुरू झाले आहे. १५ मे २०२४ पर्यंत नाशिक व दिंडोरीतून साधारणत: ६५ टक्के काम पूर्ण झाल्याचे दिसून येते. शनिवारपर्यंत घरोघरी जाऊन मतदान स्लीप देण्याचे काम जिल्हा निवडणूक विभागाच्या ‘बीएलओं’मार्फत केले जात आहे. मतदान स्लीपवर मतदारांचे नाव व त्यांचे मतदान कुठल्या केंद्रावर आहे, याविषयीची माहिती दिली जाते. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. (latest marathi news)

मोबाईलवर मतदान स्लीप

मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून वेगवेगळे फंडे वापरले जातात. यंदा मतदारांना मोबाईलवर त्यांची मतदान स्लीप पाठविली जात आहे. सोबत पक्षाचे चिन्ह, पक्षाच्या नेत्यांची आणि उमेदवाराविषयी माहिती दिली जात असल्याने ‘स्मार्ट’ प्रचाराचा फंडा वापरत असल्याचे दिसून येते.

तालुकानिहाय मतदानपत्रिका

तालुका ..................... एकूण मतदान ..... मतपत्रिकावाटप

नांदगाव ........................... ३,३२,५१२ ............२,६४,१२९

कळवण-सुरगाणा..........२,९४,००३.............२,४९,३७४

चांदवड-देवळा................२,९९,३०४............२,६७,१८४

येवला..............................३,१४,५५१.............२,८८,४५९

निफाड............................२,९१,४५९..............२,४९,७४१

दिंडोरी............................३,२१,५५८...............३,००,४८१

एकूण.............................१८,५३,३८७.........१६,१९,३६८

सिन्नर.......................३,०६,५३३...................२,६७,८६४

नाशिक पूर्व..............३,८८,४८५...................३,०१,२५७

नाशिक मध्य..........३,२८,०५४....................२,६१,२८७

नाशिक पश्‍चिम......४,५६,०९६...................३,०२,७३१

देवळाली...................२,७६,९०२...................२,५७,८४७

इगतपुरी..................२,७४,०५४...................२,५८,६८२

एकूण.......................२०,३०,१२४.................१६,४९,६६८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT