Nashik Lok Sabha Constituency esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : नाशिकमध्ये 39 तर दिंडोरीत 20 उमेदवारांचे अर्ज; प्राप्त अर्जाची आज छाननी

Lok Sabha Constituency : शिकसाठी एकूण ३९ तर दिंडोरीसाठी २० उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी शुक्रवारी (ता.३) नाशिक मतदारसंघासाठी २५ तर दिंडोरी मतदारसंघासाठी ११ उमेदवारांनी अर्ज दाखल झाले. त्यामुळे नाशिकसाठी एकूण ३९ तर दिंडोरीसाठी २० उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. माघारीनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. ( 39 candidates in Nashik and 20 in Dindori )

लोकसभा निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारी संपली असून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यत नाशिक लोकसभा मतदारसंघात ३९ उमेदवारांनी ५६ अर्ज तर दिंडोरीत २० उमेदवारांनी २९ अर्ज दाखल केले आहेत. या दोन्ही मतदार संघात एकुण ५९ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. शनिवारी (ता.४) उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून सोमवारी (ता.६) उमेदवारी माघारी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारी दुपारी तीन वाजता संपुष्टात आली. या दिवशी विहित मुदतीत अर्ज भरण्याची अनेकांची लगबग सुरू होती. वंचित बहुजन आघाडीतर्फे नाशिकमधून करण गायकर तर दिंडोरीतून मालती थविल यांनी अर्ज दाखल केला. शिवसेनेचा उल्लेख करून अर्ज भरणाऱ्या शांतीगिरी महाराजांना पक्षाचा अधिकृत एबी अर्ज मिळाला नाही. (latest political news)

त्यामुळे त्यांनी निवडणूक लढविण्याचा दावा करीत पुन्हा एकदा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनीही अर्ज भरून बंडखोरीचे संकेत दिले. सटाण्याचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी दिंडोरीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. दिवसभरात विविध पक्षांसह सुमारे ३३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

नाशिकसाठी ११० इच्छुकांनी १८४ अर्ज तर दिंडोरीसाठी ३० इच्छुकांनी ७९ उमेदवारी अर्ज खरेदी केले होते. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत नाशिक लोकसभा मतदारसंघात ३९ उमेदवारांनी ५६ अर्ज तर दिंडोरीत २० उमेदवारांनी २९ अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. उमेदवारी अर्जांची शनिवारी सकाळी ११ वाजेपासून छाननी होणार आहे. सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीची मुदत आहे.

दोन्ही मतदारसंघात १४९ उमेदवारांनी घेतले अर्ज

नाशिक लोकसभा निवडणूक २०२४ ची नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अधिसूचना २६ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर अंतिम दिनांकअखेर म्हणजेच शुक्रवारी (ता.३) मे पर्यंत दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी ३९ उमेदवारांनी ७९ अर्ज घेतले. तर नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी ११० उमेदवारांनी १८४ अर्ज घेतले. अशा दोन्ही मतदारसंघात एकूण १४९ उमेदवारांना २६३ अर्जांची विक्री झाली आहे. या अर्ज विक्रीतून निवडणूक विभागाला २६ हजार ३०० रुपये मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT