BJP leader Girish Mahajan met and discussed with NCP leader Chhagan Bhujbal at Bhujbal farm along with MLAs Rahul Dhikle, Ranjan Thackeray, Prashant Jadhav etc.  esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : नाराजी दूर करण्यासाठी भुजबळांच्या दारी महाजन; बंद दाराआड सव्वा तास चर्चा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Constituency : राज्याचे ‘हेवीवेट’ नेते छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर करण्यास विलंब झाल्याने अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त करीत उमेदवारीच्या स्पर्धेतून माघारी घेतली. मात्र, भुजबळ यांच्या माघारीनंतर ओबीसी समाजाचा रोष ओढवला जाऊ नये, त्याचा परिणाम नाशिकसह राज्यात मतपेटीतून दिसू नये, यासाठी भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी आज थेट भुजबळ यांचे निवासस्थान गाठले. ( Bhujbal met Mahajan to clear displeasure )

जवळपास सव्वा तास चाललेल्या बैठकीनंतर नाशिकच्या जागेसंदर्भात चर्चा झाल्याचे दोघांकडून सांगण्यात आले. मात्र, या बैठकीत भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महायुतीच्या उमेदवाराची घोषणा अद्यापही न झाल्याने अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे. दहा वर्षांपासून शिवसेनेचा खासदार असल्याने शिवसेनेकडून (शिंदे गट) नाशिकच्या जागेवर दावा करण्यात आला.

यासंदर्भात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तशी घोषणा करताना विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना हॅट्‌ट्रिक करण्याचे आवाहन केले. मात्र, महायुती म्हणून शिंदे यांनी केलेली घोषणा भाजपच्या पचनी पडली नाही. त्यामुळे स्थानिक नेतृत्वाने पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रार करीत महायुतीचा धर्म पाळला गेला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

नाशिकमध्ये भाजपचे तीन आमदार व महापालिकेत सत्ता असल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा असल्याचे सांगत नाशिकच्या जागेसाठी आंदोलनही केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्ह्यात पाच आमदार असल्याने नाशिकच्या जागेवर दावा केला गेला. एकंदरीत नाशिकच्या जागेसाठी महायुतीत स्पर्धा सुरू असताना अचानक छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आले. (Nashik Political News)

त्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले. भाजपकडून ‘माधव’ पॅटर्न अमलात आणण्याचा हा भाग असल्याचे बोलले गेले. मात्र, भुजबळ यांची महायुतीकडून उमेदवारी जाहीर केली गेली नाही. विलंब होत असल्याने स्वतः भुजबळ यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नाशिकच्या जागेवरचा स्वतःचा दावा काढून घेतला. त्यानंतर अद्यापपर्यंत उमेदवार जाहीर झाला नाही. भुजबळ यांच्या माघारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकी घेत भुजबळांचे मन वळविण्याचा ठराव केला.

दुसरीकडे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी भुजबळ यांना निवडणूक लढविण्यासाठी आग्रह धरला. भुजबळ यांच्याकडूनही वृत्तवाहिन्यांना मुलाखत देताना २० मे पर्यंत उमेदवारी जाहीर करावी, राज्यात शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत सहानुभूती असल्याचे वक्तव्य केले. अर्थात, नंतर आपल्या तोंडी वाक्य घालण्यात आल्याचा खुलासा त्यांनी केला.

परंतु, त्यांच्या वक्तव्यातून अप्रत्यक्ष नाराजी प्रकट होत गेली. भुजबळ ओबीसींचे नेते असल्याने त्यांची नाराजी माधव पॅटर्नसाठी परवडणारी नाही, ही बाब भाजप नेत्यांच्या लक्षात आली. चौथ्या व पाचव्या टप्प्यात ओबीसीबहुल मतदारसंघांमध्ये मतदान होत असून, भुजबळ यांच्या नाराजीचा संदेश ओबीसी समाजात गेल्यास त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाजन यांनी नाशिक भेटीदरम्यान भुजबळ यांच्या निवासस्थानी भेट दिली.

जवळपास सव्वा तास दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू होती. नाशिकच्या जागेसंदर्भात चर्चा सुरू असल्याचे माध्यमांसमोर भुजबळ व महाजन यांनी स्पष्टीकरण दिले असले, तरी भुजबळांची नाराजी दूर करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

जागा निवडून आणण्यासंदर्भात चर्चा

बंद दाराआड सव्वा तास चर्चा झाल्यावर भुजबळ व महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. भुजबळ म्हणाले, की माझ्या नाराजीचा प्रश्न नाही. राज्यात काही ठिकाणी ओबीसी समाज नाराज असला, तरी सर्वांची समजूत काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी एकत्रित प्रचार करणार. मोदींना पुन्हा देशाचे पंतप्रधान करावे लागेल.

आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा अभ्यास केल्यास मोदींचे नेतृत्व आवश्यक आहे. नाशिकमधून मताधिक्य मिळवून देण्यासाठी काय करावे लागेल, या संदर्भात चर्चा झाली. महाजन म्हणाले, की नाशिकच्या जागेसंदर्भात १ मेस सकाळी दहा ते अकरापर्यंत कुठल्या पक्षाला जागा सोडली जाईल, त्याबाबत चर्चा होऊन उमेदवाराची घोषणा केली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT