shiv sena shinde , shiv sena thackeray Group Logo esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : महायुतीच्या रॅलीत दोन्ही शिवसेना आमने-सामने; ठाकरे गटाने मशाल पेटवत दिल्या घोषणा

Lok Sabha Constituency : महायुतीच्या उमेदवारांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढलेल्या रॅलीदरम्यान शिवसेना (शिंदे गट) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) एकमेकांसमोर आली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवारांनी गुरुवारी (ता. २) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढलेल्या रॅलीदरम्यान शिवसेना (शिंदे गट) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) एकमेकांसमोर आली. त्या वेळी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाचे चिन्ह असलेल्या मशाली पेटवून जोरदार घोषणाबाजी केली. (Nashik Lok Sabha Constituency)

तर शिंदे शिवसेनेनेही त्यास घोषणांतून प्रत्युत्तर देण्याचा या वेळी प्रयत्न केला. नाशिक मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे आणि दिंडोरीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी शहरातील बी. डी. भालेकर शाळेपासून कार्यकर्त्यांची रॅली काढली.

ही रॅली शालिमार येथील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयाजवळ आली असता दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला. शिंदे गटाचे उमेदवार आणि कार्यकर्ते शालिमार येथे आले असता, शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाचे चिन्ह असलेल्या मशाली पेटवून हातात घेत, जोरदार घोषणा दिल्या. (Latest Marathi News)

‘हम सब खुद्दार बाकी सब गद्दार’ अशा घोषणा देत शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार गोडसे यांना हिनविण्याचा प्रयत्न केला. शिंदे शिवसेनेकडून नाशिकचा खासदार कसा पाहिजे, त्या वेळी ठाकरे गटाने राजाभाऊ वाजेंसारखा पाहिजे, अशी घोषणा देत प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू होती.

त्यामुळे ही रॅली ठाकरे गटाच्या कार्यालयापासून पुढे जाईपर्यंत पोलिसांची सातत्याने धावपळ सुरू होती. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. अचानक झालेल्या या प्रकाराने शिंदे गटातील कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ उडाली. यावेळी ठाकरे गटाचे बाळासाहेब कोकणे, ऋषी वर्मा, संजय परदेशी. इमरान तांबोळी, फहिम शेख, राजू वाकसरे, सुनील गोडसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पोलिसांची कामगिरी वाचून व्हाल थक्क; स्मशानभूमीतील लाकडावरुन लावला खुनाचा तपास!

Adani Group: अमेरिकेनंतर आता बांगलादेश देणार अदानींना झटका; करोडोंच्या डीलची होणार चौकशी, काय आहे प्रकरण?

Karad Election: पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील कसे झाले पराभूत? आघाडीत बिघाडीचा दोघांनाही बसला फटका, जाणून घ्या सविस्तर

Viral Video : नवरा बनला सुपरमॅन; चोराला पकडण्यासाठी फिल्मी स्टाईलने टॅम्पोला लटकला!

IPL 2025 Mega Auction Live Streaming: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

SCROLL FOR NEXT