Nashik Lok Sabha Constituency esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : शहरातील मतदारांवर उमेदवारांच्या यशापयशाचे भवितव्य!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तब्बल सहा आमदारांच्या मतदारसंघमिळून लोकसभेचा एक खासदार निवडला जात असल्याने प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला महत्त्व प्राप्त झालेले असते. एका मतदारसंघातून उमेदवारांना किती मताधिक्य मिळते आणि कोण मागे राहातो, यावर जय अन्‌ पराजयाचे समीकरण अवलंबून असते. (Nashik Lok Sabha Constituency)

त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला विधानसभा क्षेत्र डोळ्यासमोर ठेवून प्रचाराची व मतदानाची व्यूहरचना आखावी लागणार आहे. शहरातील मतदानावर उमेदवारांच्या यशापयशाचे गणित अवलंबून राहणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात शहरातील नाशिक पूर्व, मध्य, पश्‍चिम, देवळाली यांसह सिन्नर व इगतपुरी हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ५९.४८ टक्के मतदान झाले. शहरात साधारणतः बारा लाख मतदार आहेत. उर्वरित मतदार हे सिन्नर, त्र्यंबक-इगतपुरी मतदारसंघात म्हणजेच ग्रामीण भागातील आहेत. २०१९च्या निवडणुकीत नाशिक पूर्व आणि पश्‍चिम या दोन मतदारसंघांमधून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाले होते.

यंदा परिस्थिती थोडी बिकट असल्याने त्यांना याठिकाणी जास्त कष्ट घ्यावे लागतील, असे दिसते. समीर भुजबळ यांना नाशिक मध्य व इगतपुरी या दोन मतदारसंघात चांगली मते मिळाली होती. याचे वैशिष्ट्य म्हणजे नाशिक मध्य या मतदारसंघात मुस्लिमबहुल मतदारांचे प्रमाण अधिक आहे. तर इगतपुरी-त्र्यंबक या ग्रामीण भागातील मतदारांनी राष्ट्रवादीला साथ दिल्याचे दिसून येते. (Latest Marathi News)

या तुलनेत तिसऱ्या स्थानी राहिलेले सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांना सिन्नरमध्ये सर्वाधिक ९१ हजार मते मिळाली होती. बाकीच्या मतदारसंघांमध्ये ते पिछाडीवर असल्याचे दिसून येते. २०१९च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची चांगली हवा होती.

त्यामुळे पवन पवार यांना चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती. यंदा दोन तुल्यबळ उमेदवारांसह दोन महाराज आखाड्यात उतरल्याने मतांचे विभाजन होणे अटळ दिसते. २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये मतांचे विभाजन कसे होते, यावर उमेदवाराचा विजय निश्‍चित होणार आहे.

शहरी अन्‌ ग्रामीण मतदार

नाशिक लोकसभा मतदारसंघात नाशिक शहर, शहरालगतची निमशहरी गावे, ग्रामीण व आदिवासी भागात पाड्यावर राहणारा मतदार या सर्वांचा समावेश होतो. त्यामुळे शहरातील उच्चभ्रू वस्तीत राहणारा वर्ग व एखाद्या आदिवासी पाड्यावरील व्यक्तीचा कौल आजमावणारा हा मतदारसंघ आहे. शहरात सर्वाधिक मतदार असले तरी मतदान किती टक्के होते, यावर बरेच गणित अवलंबून असणार आहे.

२०१९ च्या निवडणुकीत नाशिक लोकसभेचे चित्र

उमेदवार .. सिन्नर ... नाशिकपूर्व .. मध्य ... पश्‍चिम .... देवळाली .. इगतपुरी

हेमंत गोडसे .. ५६६७६ ... ११७१२७ ... ९४४२९ .. १४४१४४ .. ८०६८८ ... ६८९७०

समीर भुजबळ ... ३०९४२ ... ४०८५९ ... ५६४५९ ... ४०३२१ ... ३८७५५ .. ६३५१८

पवन पवार ..... ९०९५ ... २४७७६ .... १५४०५ ..... २०७८४ ..... २४४५९ ... १५३१७

माणिकराव कोकाटे .. ९१११४ ... ६६६६ .... ५९६४ .... ६७१९ ... १००९६ .... १३६७०

उमेदवारनिहाय मिळालेली मते

हेमंत गोडसे : ५,६२,०३४

समीर भुजबळ : २,७०,८५४

पवन पवार : १,०९,८३६

माणिकराव कोकाटे : १,३४,२२९

नाशिक लोकसभा मतदार तुलना

२०१९ : १८ लाख ८५ हजार ६४

२०२४ : २० लाख ३० हजार १२४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT