MLA Jiva Pandu Gavit speaking at the Janmat Kaul meeting held on Friday in an open space near the Nashik-Kalwan road of the Agriculture Department. At this time Prashant Khairnar, Dr. D. L. Karad, party workers were present. esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीत बिघाडी, महायुतीची वाढली डोकेदुखी; ‘दिंडोरी’त चव्हाण अपक्ष उमेदवारीवर ठाम

Lok Sabha Constituency : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Constituency : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. आघाडीतील घटक पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने उमेदवारी मागितली. न मिळाल्यास निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केला आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण अपक्ष उमेदवारीवर ठाम असल्याने महायुतीचीही डोकेदुखी वाढली. (nashik lok sabha Constituency Chavan insists on independent candidate in Dindori marathi news )

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार डॉ. भारती पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून भास्कर भगरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत माकप आघाडीबरोबर असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता माकपचे माजी आमदार जे. पी. गावित हे दिंडोरीतून लोकसभा निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. (latest marathi news)

त्यांनी शुक्रवारी (ता. १९) दिंडोरीत पक्षाचा मेळावा घेतला. यात आघाडीने हा मतदारसंघ माकपला सोडावा, अशी मागणी करणारा ठराव केला. आघाडीने मित्रपक्षाचा विचार न केल्यास माकप उमेदवार निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. त्यामुळे दिंडोरीत महाविकास आघाडीत बिघाडी होण्याच्या मार्गावर आहे. गावित यांच्या भूमिकेमुळे आघाडीचे उमेदवार भगरे यांच्या अडचणी वाढतील. महाविकास आघाडीपाठोपाठ महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.

भाजपचे माजी खासदार चव्हाण यांनीही अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे जाहीर करीत, त्यावर ठाम राहणार असल्याचे सांगितले. तसेच, चव्हाण यांनी कळवण येथे डॉ. भारती पवार यांच्यावर टीकास्त्र सोडत पाच वर्षांत माझी आठवण झाली नाही, आता अडचणीत आल्यावरच माझी आठवण झाली का, असा सवाल केला. त्यामुळे महायुतीपुढेही पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. गावित व चव्हाण यांच्या भूमिकेमुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT