Mahayu and mahavikas aghadi  esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election 2024 : उमेदवार निश्‍चिती अभावी इच्छुकांच्या प्रचार तलवारी म्यान

Lok Sabha Election : महायुतीसह महाविकास आघाडीकडून देखील नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर केला जात नसल्याने इच्छुकांनी प्रचाराची हत्यारे म्यान केल्याचे दिसून येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election 2024 : मे महिन्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीकडून देखील नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर केला जात नसल्याने इच्छुकांनी प्रचाराची हत्यारे म्यान केल्याचे दिसून येत आहे.

महायुतीत अद्याप जागेची निश्‍चिती नाही. जागा निश्‍चितीनंतर उमेदवार निश्‍चिती होईल तर महाविकास आघाडीत शिवसेनेला जागा सोडली जाणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. (Nashik Lok Sabha Constituency election 2024 Maha Vikas Aghadi mahayuti marathi news)

फक्त उमेदवार कोण? यावर गाडी अडली आहे. महाविकास आघाडी व महायुती दोन्ही कडून प्रथम उमेदवार घोषित करण्याची वाट पाहीली जात आहे. देशामध्ये सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहे. त्यात नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी मे महिन्यात निवडणुका होतील. त्यामुळे जवळपास दोन महिन्यांचा कालावधी असल्याने महायुती सह महाविकास आघाडी कडून अद्याप उमेदवार जाहीर केल्या जात नाही.

परिणामी इच्छुकांनी प्रचाराची हत्यारे म्यान करण्यात आली आहे. महायुतीमध्ये नाशिकची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी दहा वर्षात केलेल्या कामांचा सोशल मीडियावर धडाका लावला आहे. खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी नाशिक मध्ये गोडसे यांना तयारीला लागा.

जागा आपलीच असल्याचे जाहीर सभेत घोषित केल्यानंतर गोडसे यांनी प्रचाराचा वेग वाढविला. दुसरीकडे महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने देखील निवडणुकीची तयारी केली आहे. सर्वेक्षणामध्ये भाजप आघाडीवर असल्याचा दावा करण्यात आला. त्यानुसार भाजपकडून इच्छुकांची संख्या वाढली. दिनकर पाटील यांनी भाजपकडून आधीचं तयारी सुरू केली. (latest marathi news)

सर्वेक्षणामध्ये आमदार ऍड राहुल ढिकले यांचे देखील नाव आल्याने त्यांनी उघडपणे प्रचार केला नसला तरी पूर्व विधानसभा मतदार संघामध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी विविध कार्यक्रमांचा उद्घाटन सोहळा दिमाखात पार पाडला. पश्चिमच्या आमदार सीमा हिरे, नाशिक लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे संघटक केदा आहेर, चांदवडचे आमदार डॉ राहुल आहेर यांचे देखील नाव चर्चेत आले.

लोकसभा उमेदवार म्हणून उघडपणे प्रचारात उतरले नसले तरी उमेदवारी जाहीर झाल्यास ऐनवेळी धावपळ नको म्हणून प्रचाराची संपूर्ण तयारी करण्याबरोबरच व्यक्तिगत गाठीभेटींवर भर देण्यात आला. महायुतीतील तिसरा घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सिन्नरचे आमदार ऍड माणिक कोकाटे यांचे नाव चर्चेत आले.

त्याचबरोबर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ऍड नितीन ठाकरे यांचे नाव देखील लोकसभेसाठी चर्चेत आले. पक्ष संदर्भात त्यांची निश्चिती नसली तरी निवडणूक लढण्याची त्यांची महत्त्वकांक्षा लपून राहिली नाही. महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून देखील अनेकांनी निवडणुकीसाठी इच्छा व्यक्त केली.

शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून विजय करंजकर यांचे नाव चर्चेत आले. परंतू सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे देखील एकाएकी नाव चर्चेत आले. पहिल्या टप्‍यात इच्छुकांकडून प्रचाराचा धुराळा उडाला. परंतु निवडणुकांना दोन महिने शिल्लक असल्याने महायुती किंवा महाविकास आघाडीचा जागा व उमेदवारीचा तिढा अद्याप कायम ठेवण्यात आल्याने कोणी उघड तर कोणी व्यक्तिगत गाठीभेटींच्या माध्यमातून सुरू केलेला प्रचार आता थंड पडला आहे.

मनसेही प्रचाराच्या मैदानात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपकडून लोकसभेच्या दोन जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे त्यात नाशिक मधून मनसेचा उमेदवार द्यावा अशी मागणी त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. ऐनवेळी काय निर्णय होईल याबाबत काहीच सांगता येत नाही असा तर्क लावून मनसेकडून देखील लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.

उमेदवारांना खर्चाची चिंता

लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना खर्चाची चिंता सतावत आहे. एन वेळी तिकीट कापल्या नंतर प्रचारासाठी केलेला खर्च वाया जाण्याच्या भीतीने देखील लोकसभेचा प्रचार थंडावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

सुबोध-तेजश्रीचे जुळले सूर ; बहुप्रतीक्षित हॅशटॅग तदैव लग्नम सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

Dev Diwali 2024: देव दिवाळी का साजरी केली जाते? वाचा इतिहास अन् धार्मिक महत्व

Supriya Sule In Nashik : कांद्याला हमीभाव मिळवून देणार; खासदार सुप्रिया सुळे यांची चांदवडच्या सभेत ग्वाही

SCROLL FOR NEXT