Nashik Lok Sabha Constituency  esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : मतदानाच्या वाढीव टक्क्याचा कल ‘महाविकास’कडे

विक्रांत मते

Nashik News : नाशिक लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून त्यात शहरी चार मतदार संघाचा प्रभाव आहे. यातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात अवघे एक लाख ८७ हजार ४९१ मतदान झाले, याची टक्केवारी ५७.१५ आहे. एकूण लोकसंख्येचा विचार करता झालेले मतदान महाविकास आघाडीसाठीच पूरक ठरण्याची शक्यता दिसून येत आहे. मतपेटीतून ४ जूनला खरा निकाल बाहेर पडेल. (Nashik Lok Sabha Constituency)

मात्र तूर्त मतदानाची आकडेवारी लक्षात घेता सत्ताधारी पक्षाला धोक्याची घंटा ठरू शकते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडले या मतदान प्रक्रियेत नाशिक लोकसभा मतदारसंघ मध्ये मतदानाची टक्केवारी किंचित वाढली आहे. मात्र या किंचित वाढीव टक्केवारीचा फायदा महाविकास आघाडीला होईल की महायुतीला यावरून चर्चा सुरू आहे.

लोकसभेच्या नाशिक मतदार संघामध्ये विधानसभेचे सहा मतदार संघ येतात. यात सिन्नर, इगतपुरी हे दोन ग्रामीण मतदार संघ वगळता मध्य, पश्चिम, पूर्व व देवळाली हे चार मतदार संघ शहरी भागातील आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये जवळपास 20 लाख मतदार आहे यातील 12 लाख मतदार हे शहरी मतदार संघातील आहे.

शहरी मतदार संघामध्ये मध्य मतदारसंघ हा मतदानाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील समजला जातो. या संवेदनशील मतदार संघामध्ये मुस्लिम व दलित मतदारांची संख्या लक्षणीय आहे. दलित व मुस्लिम मतदारांचा कल येथील लोकप्रतिनिधी निश्चित करतो. नाशिक मध्य मतदार संघामध्ये सन 2019 मध्ये एक लाख 72 हजार 257 मतदान झाले होते यंदा म्हणजे 2024 मध्ये एक लाख 87 हजार 491 एवढे मतदान झाले. (latest marathi news)

मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का वाढला हे यावरून स्पष्ट होते. परंतु हे वाढते मतदान कोणाला लाभदायक ठरते यावरून मध्य विधानसभा मतदारसंघांमध्ये चर्चा सुरू आहे. मतदानाच्या दिवशी सकाळपासून जुन्या नाशिक मधील मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली ती गर्दी संध्याकाळपर्यंत कायम होती.

जुने नाशिक मधील बहुतांश मतदार मुस्लिमबहुल आहेत. त्या व्यतिरिक्त भारत नगर, वडाळा, गांधीनगर, उपनगर या भागात दलित मतदारांची संख्या मोठी आहे. येथे देखील सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी दिसून आली. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचे स्पष्ट होते.

मतदानाची टक्केवारी वाढल्याने सुरू झालेल्या चर्चेत तूर्त महाविकास आघाडीच्या बाजूने चर्चेचा कल दिसतो. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या दृष्टीने मध्य विधानसभा मतदारसंघांमध्ये वाढलेले मतदान धोक्याची घंटा ठरू शकते अशी चर्चा सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT