Nashik Lok Sabha Constituency esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : महायुती मधील ट्विस्ट अद्यापही कायम! नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीचा कॉंग्रेसचा दावा

Lok Sabha Constituency : नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा कायम असल्याची भूमिकादेखील भुजबळ यांनी जाहीर केल्याने नाशिकच्या जागे संदर्भातील महायुती मधील ट्विस्ट अद्यापही कायम आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Constituency : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघातून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माघार घेत असल्याची घोषणा केली असली तरी दुसरीकडे मात्र नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा कायम असल्याची भूमिकादेखील भुजबळ यांनी जाहीर केल्याने नाशिकच्या जागे संदर्भातील महायुती मधील ट्विस्ट अद्यापही कायम आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नाशिक दौऱ्यावर आले. (Nashik Lok Sabha Constituency NCP claim to Congress on seat of Nashik in Grand Alliance )

यावेळी त्यांच्या भुजबळ फार्म येथील निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा कायम आहे. एखाद्या जागेसाठी कुठल्या पक्षाने दावा करणे काही गैर नाही. राष्ट्रवादीचा दावा कायम आहे. आमच्याकडे माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार ॲड. माणिक कोकाटे, निवृत्ती अरिंगळे, प्रेरणा बलकवडे आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेकडे देखील हेमंत गोडसे, अजय बोरस्ते आहेत.

विजय करंजकर यांना विचारले जात आहे. भाजपकडे दिनकर पाटील यांच्यासह तीन आमदार व शांतिगिरी महाराज आहेत. महायुतीमध्ये नाशिकची जागा कोणालाही द्या, मात्र आता अधिक विलंब होता कामा नये, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, असे मी कोठेही म्हटलेले नाही. फक्त ओबीसी आरक्षणात कोणाची घुसखोरी नको, एवढेच माझे म्हणणे आहे. आरक्षणाच्या भूमिकेमुळे कोणाचे नुकसान होऊ नये असे मला वाटते.

मराठा समाजाला स्वतंत्र व टिकणारे आरक्षण द्यावे, त्यानुसार सरकारने स्वतंत्र आरक्षण दिले आहे ते टिकणारे असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. छगन भुजबळ प्रचाराला आले म्हणजे मराठा मतदार नाराज होऊ शकतो, असे काहींना वाटते. परंतु आपण महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी काम करणार आहोत. ज्यांना वाटत असेल भुजबळ आल्यानंतर मराठा समाजाची मते कमी होतील, त्याठिकाणी मी जाणार नाही. जे प्रेमाने बोलावतील, तेथे जाईल. अनेक ठिकाणी अनेकांनी मला प्रचाराला बोलावले असल्याची पुस्तीदेखील भुजबळ यांनी जोडली.  (Nashik Political News)

उमेदवारीबाबत महायुतीत विसंवाद

माझ्या उमेदवारीसाठी अनेकांचा आग्रह आहे, मात्र त्यांची मी समजूत घातली आहे. उमेदवारी कोणालाही द्या, मात्र लवकरात लवकर उमेदवारी जाहीर होणे गरजेचे आहे. विरोधी पक्ष प्रचारात पुढे गेला आहे. उमेदवारी संदर्भात महायुतीमध्ये विसंवाद कारणीभूत आहे की दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून निर्णय घेतला जात नाही या प्रश्नावर भुजबळ यांनी बोलणे टाळले. महायुतीचे खासदार हेमंत गोडसे हे मलाच उमेदवारी मिळणार असे सांगत असले तरी गोडसे यांनी ही गोड बातमी आम्हाला द्यावी, असे सांगताना नाशिकसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा असल्याचे त्यांनी आग्रहपूर्वक सांगितले.

मी एकदाच तिकीट मागितले

नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी संदर्भात बोलताना भुजबळ म्हणाले, मुंबई महापालिकेच्या नगरसेवकपदाच्या निवडणुकीसाठी मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे एकदाच तिकीट मागितले. त्यानंतर मी तिकीट मागितलेले नाही, माझ्यावर तिकीट मागण्याची वेळदेखील आली नाही. याउलट अनेकांना तिकीटे वाटली.

यावेळी दिल्लीच्या नेत्यांना मी निवडणूक लढवावी असे वाटले म्हणून त्यांची मागणी होती. त्यानुसार मी नाशिक लोकसभा मतदारसंघात तयारीला लागलो होतो, मात्र दिल्ली नेतृत्वाकडे काही अडचणी असतील त्याबद्दल काही सांगता येत नाही परंतु नाशिकचा तिढा सुटत नाही. माझ्यावर नेत्यांनी जे प्रेम दाखवले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. विशेषत: दिल्लीतील नेत्यांचा आभारी असल्याचे भुजबळ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT