Prime Minister Narendra Modi esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : कांदा प्रश्नावरून मोदींच्या सभेचे ठिकाण बदलाची शक्यता; पोलिसांच्या गोपनीय शाखेचा अहवाल

Lok Sabha Constituency : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत्या १५ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पिंपळगाव बसवंत येथे होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी येत्या २० तारखेला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत्या १५ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पिंपळगाव बसवंत येथे होणार आहे. परंतु कांदा प्रश्नावरून महायुतीच्या उमेदवारांना शेतकरी मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने त्याचा परिणाम मोदी यांच्या सभेवरही होण्याची शक्यता असल्याचा गोपनीय अहवाल पोलिसांनी दिल्याचे समजते. (Nashik Lok Sabha Constituency)

त्यामुळे पंतप्रधान मोदी यांची सभा पिंपळगाव बसवंतऐवजी नाशिकमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने चाचपणीही सुरू आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पोलीस महासंचालकांनीही ग्रामीण पोलिसांच्या सभेच्या पार्श्वभूमीवरील तयारीबाबत तीव्र नाराजीही व्यक्त केल्याचे कळते. लोकसभा निवडणुकीचा प्रचार राज्यभरात शिगेला पोहोचला आहे.

येत्या २० तारखेला नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पिंपळगाव बसवंत येथे बुधवारी (ता.१५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा नियोजित आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात आढावा बैठक घेतली.

लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासह पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य राजकीय नेत्यांच्या सभा व दौऱ्यांच्या बंदोबस्ताचाही आढावा यावेळी घेण्यात आला. या बैठकीला विशेष पोलीस महानिरीक्षकांसह पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. नाशिक जिल्हा कांदा उत्पादक जिल्हा असून, कांद्यावरील निर्यातबंदीमुळ जिलह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. (latest marathi news)

त्यामुळे ग्रामीण भागात महायुतीच्या उमेदवारांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. विशेष शाखा व गोपनीय विभागानेही यासंदर्भातील माहिती पोलीस महासंचालकांना दिली आहे. परिणामी, पिंपळगाव बसवंत येथे मोदींच्या सभेची तयारी सुरु असली तरी, सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांनी नाशिक शहरात सभा घेण्यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार चाचपणी केली जात असल्याचे समजते.

नियोजनाचा अभाव

पोलिस महासंचालकांनी दोन दिवसांपूर्वी अचानक भेट देत निवडणूक व पंतप्रधान मोदी यांची सभा यासंदर्भातील बंदोबस्ताचा आढावा घेतला. त्यावेळी ग्रामीण पोलीसांच्या बंदोबस्ताच्या नियोजनात मोठा अभाव निदर्शनास आल्याने पोलीस महासंचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळेही पंतप्रधान मोदी यांची नियोजित सभा शहरात घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कारवाईची शक्यता

पंतप्रधान मोदी यांची सभा बुधवारी असून, त्यापूर्वी शहर-ग्रामीण पोलिसांकडून कांदाप्रश्नी आंदोलन वा निदर्शने करणाऱ्या शेतकरी, कार्यकर्त्यांविरोधात कारवाईची शक्यता आहे. शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांना नजरकैद केले जाण्याची शक्यता असून, तत्पूर्वी नोटीसाही बजाविल्या जातील असे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT