Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party chief Uddhav Thackeray felicitating Nashik MP Rajabhau Waje. esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : भाजप आमदारांना ‘उद्धव’ शिलेदार भारी! सत्ता नसताना संघर्षात्मक लढा उभारण्याचा दिला संदेश

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक तसा भारतीय जनता पक्षाचा गड. नाशिक शहरात भाजपचे तीन आमदार आहेत. नाशिक पूर्व, मध्य आणि पश्चिममधील आमदार असूनही महायुतीचे हेमंत गोडसे यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपच्या विद्यमान आमदारांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील ज्येष्ठांनी जोरदार दणका दिला आहे. (Nashik Lok Sabha Constituency)

सत्ता नसताना कशाप्रकारे संघर्षात्मक लढा उभारायचा, हेच जणू या ‘उद्धव’ शिलेदारांनी दाखवून दिले. महाविकास आघाडीचे विजयी झालेले खासदार राजाभाऊ वाजे हे ग्रामीण भागातील उमेदवार असल्याने त्यांना नाशिक शहरातील मतदार किती साथ देतील, हा प्रश्न सातत्याने उपस्थित होत होता. मात्र, शिवसेना पक्षाच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने काम करून विद्यमान आमदारांनाही एकप्रकारे धोबीपछाड दिली आहे.

आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतलेली झेप महत्त्वाची मानली जाते. महाविकास आघाडीचा विजय निश्चित करणाऱ्यांमध्ये सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, वसंत गिते, दत्ता गायकवाड, विनायक पांडे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यावरही उद्धव ठाकरे यांचे हे शिलेदार नाशिकमध्ये तग धरून होते.

या अनुभवी नेत्यांमुळे महाविकास आघाडीचा लोकसभेतील विजय साध्य होऊ शकला, ही भावना आता सामान्य शिवसैनिकही व्यक्त करीत आहे. सिन्नर, देवळाली आणि इगतपुरी या मतदारसंघांमधून राजाभाऊंना आघाडी मिळणे स्वाभाविक होते. (latest marathi news)

तशी यंत्रणा त्यांनी सुरवातीपासून उभारलेली होती. मात्र, त्यात शहरी मतदार किती भर घालतात, हे पाहणे महत्त्वाचे होते. नाशिक पूर्व, मध्य आणि पश्चिम या तिन्ही मतदारसंघांमधून राजाभाऊ वाजे यांना दोन लाख ७२ हजार २४० मते मिळाली आहेत. ही मते रोखणे भाजपच्या आमदारांना शक्य झाले असते तर महायुतीला त्याचा फायदा नक्कीच झाला असता.

वाजे यांना शहरातून मिळालेली मते

नाशिक पूर्व- ८९ हजार ९११

नाशिक मध्य- ८८ हजार ७१२

नाशिक पश्चिम- ९३ हजार ६१७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT