नाशिक : सन २०१९ च्या निवडणुकीत भाजपकडून विजयी झालेल्या डॉ. भारती पवार ह्या जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार ठरल्या होत्या. खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांना काम करण्याची संधी मिळाली.
त्यामुळे डॉ. पवार यांच्या रूपाने नाशिक जिल्ह्याला केंद्रीय मंत्रीपदाचा देखील पहिल्यांदाच बहुमान मिळाला होता. यापूर्वी मालेगाव मतदारसंघातून पाचवेळा प्रतिनिधीत्व करणाऱ्या झामरु मंगळू (झेड. एम.) कहांडोळे तसेच मालेगाव व दिंडोरीतून तीन वेळा प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळूनही हरिश्चंद्र चव्हाण यांना मंत्रीपदाचा मान मिळाला नव्हता. (Nashik Lok Sabha election 2024 bharti pawar marathi news)
सन १९५७ पासून झालेल्या लोकसभा निवडणुकीत मालेगाव लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड राहिलेला आहे. स्व. इंदिरा गांधी यांच्या एकनिष्ठ अशी ओळख असलेले कहांडोळे यांनी मालेगाव मतदारसंघातून सहा वेळा निवडणूक लढवली आणि त्यात तब्बल पाच वेळा त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली होती.
पाच वेळा प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळालेल्या झेड. एम. कहांडोळे यांना मात्र, मंत्रीपदापासून दूर रहावे लागले. काँग्रेस पक्षाने एकदाही त्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात काम करण्याची संधी दिली नव्हती. नव्याने निर्माण झालेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात हरिश्चंद्र चव्हाण यांनी दोनदा विजय मिळवला होता.
त्यांच्या रूपाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघ ख-या अर्थाने भाजपचा गड झाला होता. स्व. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अविश्वास ठरावाप्रसंगी आजारी असतानाही चव्हाण पक्षासाठी संसदेत पोहचले होते. मात्र, असे असतांनाही त्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही.
नाशिक जिल्ह्याला केंद्रीय मंत्रीपदाची कायमच हुलकावणी मिळाली. उत्तर महाराष्ट्रातील खासदारांना मात्र, केंद्रीयमंत्री होण्याचा मान मिळालेला आहे. सन १९८४ मध्ये विजय नवल पाटील यांना (कै) राजीव गांधी यांच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. (Nashik Political News)
त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारचे नऊवेळा प्रतिनिधीत्व केलेल्या स्व. माणिकराव गावित यांना पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या मंत्रीमंडळात गृहराज्यमंत्री म्हणून काम करण्यास संधी मिळाली होती. तसेच सन २०१४ मध्ये धुळे लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच दिल्लीत पोहचलेले डॉ. सुभाष भामरे यांना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात स्थान मिळाले होते.
परंतू, नाशिक जिल्हा कायम मंत्रीपदापासून वंचित राहिला होता. डॉ. भारती पवार यांच्या रूपाने नाशिक जिल्ह्याला केंद्रीय मंत्र्यांचा बहुमान मिळाला. सन २०२२ मध्ये झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात त्यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर सन २०२३ मध्ये त्यांच्याकडे आदिवासी विकास विभागाचा देखील कार्यभार सोपविण्यात आला. सन २०२४ मध्ये भाजपने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी देत रिंगणात उतरविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.