Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदार संघ हा मराठा बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. यंदाची नाशिकची निवडणूक म्हणजे राज्यातील बिग फाईट ठरणार आहे. हेवीवेट नेते छगन भुजबळ यांचे नाव महायुतीकडून जवळपास निश्चित झालेले आहे. (Nashik Lok Sabha Election 2024) तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
दोन निवडणुकांमध्ये छगन भुजबळ हे पराभूत झालेले आहेत, दोन्ही वेळा जातीय समीकरणांची गोळाबेरीज झाल्याने भुजबळांना पराभूत व्हावे लागले होते. मात्र, दोन्ही वेळा ते विरोधी पक्षात होते, यंदा ते सत्ताधारी गटातील नेते असल्याने राजकीय समीकरणांचे आडाखे बांधले जात आहेत. (Nashik Lok Sabha Election 2024 Focus on Maratha candidates in district news)
नाशिक लोकसभेचा आत्तापर्यंतचा ट्रेंड पाहता मराठा विरुद्ध अन्य नेते असा मुकाबला रंगलेला आहे. गेल्या काही काळापासून मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीचे चित्र राज्यभर निर्माण झालेले आहे. त्यात छगन भुजबळ यांचा ओबीसी चेहरा राज्यभर उजळून निघाला आहे.
नाशिक लोकसभेचा विचार करता आधीच्या समीकरणांप्रमाणे यंदाही जातीय मतांचे धुव्रीकरण होण्याचा होरा आत्तापासून वर्तवला जात आहे. त्यामुळे एकपेक्षा अधिक मराठा उमेदवार कोण असतील आणि ते कुठल्या पक्षाचे असतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लोकसभेचे तिकीट मिळविण्यासाठी भाजपाकडून ज्येष्ठ नेते दिनकर पाटील, मराठा विद्याप्रसारक समाजाचे नितीन ठाकरे यांचे नाव चर्चेत होते. भुजबळांच्या तिकीटाची खात्री झाल्यानंतर ही चर्चा आता थोडी मागे पडत आहे. मात्र, दिनकर पाटील हे अन्य कुठल्या पक्षाकडून किंवा अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात असतील का, याचा अंदाज राजकीय निरीक्षक वर्तवत आहेत. (Nashik Political news)
दिनकर पाटील हे निवडणुकीच्या मैदानात असले तर छगन भुजबळ यांच्यासाठी उपयोगी ठरेल. तर दिनकर पाटील यांनी माघार घेतल्यास भुजबळांच्या अडचणी वाढू शकतात. हीच स्थिती कमी अधिक प्रमाणात अन्य मराठा समाजाच्या उमेदवारांच्या संदर्भात लागू असणार आहे.
सरळ सरळ लढत झाल्यास भुजबळांसमोरील अडचणी वाढतील. तर राजाभाऊ वाजे यांना मात्र मोकळे मैदान लाभू शकते. मराठा उमेदवारांसोबतच वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, मनसे यांच्याही भूमिका निर्णायक ठरणार आहेत. शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे.
अनौपचारीक चर्चेत आता माघार नाही, अशी भूमिका ते घेत आहेत. त्यामुळे गोडसे कुठला मार्ग निवडतात, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. एकूणच मराठा नेत्यांच्या भोवती यंदाची निवडणूक केंद्रीत राहण्याचे संकेत आत्तापासून मिळत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.