Assistant Election Decision Officer and Province Babasaheb Gadve etc. while guiding the Anganwadi workers at Yewala. esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election 2024: हिरकणी कक्ष, पाळणाघराची 320 केंद्रावर सोय! लोकसभेसाठी 200 अंगणवाडी सेविकांची नेमणूक

Nashik News : मतदारसंघात प्रथमच सर्व ३२० मतदान केंद्रावर मतदार मातांच्या बालकांसाठी पाळणाघर व हिरकणी कक्षाची सोय अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

येवला : मतदारसंघात प्रथमच सर्व ३२० मतदान केंद्रावर मतदार मातांच्या बालकांसाठी पाळणाघर व हिरकणी कक्षाची सोय अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यासाठी २०० अंगणवाडी सेविकांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी दिली. (Nashik Lok Sabha Election 2024 Hirkani room nursery facilities news)

आगामी लोकसभा निवडणुकीत येवला विधानसभा मतदारसंघात २०० अंगणवाडी सेविका मतदान केंद्रांवर तैनात करण्यात येणार असून, सोमवारी (ता.१५) या अंगणवाडी सेविकांचे उदबोधन तहसील कार्यालयात करण्यात आले. तहसील कार्यालयाच्या सभागृहात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी निवडणूक पूर्वतयारीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.

निवडणुकीत महिला मतदारांची टक्केवारी वाढावी, यासाठी प्रथमच प्रत्येक केंद्रावर मतदार मातांच्या बालकांच्या सोयीसाठी पाळणाघर व हिरकणी कक्षाची सोय अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मतदान केंद्राशेजारीच पाळणाघर असेल. त्यामध्ये माता व बालकांना बसण्याची सोय असणार आहे.  (latest marathi news)

तसेच, लहान मुलांसाठी खेळणी आणि आहाराची सुविधा असल्याने महिला मतदारांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही. महिला मतदान करून येईपर्यंत या ठिकाणी बालके खेळणार असून, त्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर असेल. उद्बोधन वर्गात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरस्सन करण्यात आले.

प्रशिक्षणासाठी नायब तहसीलदार पंकज मगर, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी वंदना शिंपी, आरती गांगुर्डे, पर्यवेक्षिका वंदना खांदवे, गीतांजली शिरसाट, सुनील महाजन उपस्थित होते.

"निवडणुकीच्या कामकाजात सहभागी होणे हे कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे सर्वांनी दिलेली जबाबदारी पार पाडावी. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रीय कार्य करण्याची संधी प्राप्त झाली आहे. कर्मचाऱ्यांनी या कार्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा."

- बाबासाहेब गाढवे, प्रांताधिकारी, येवला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT