In the Vasant Smriti office of the BJP, the party's chief office-bearers demanded that the seat of Nashik should be given to the BJP in front of the party's state general minister Vijay Chaudhary. esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election: नाशिकचा खासदार कमळाचाच...! भाजप पदाधिकाऱ्यांचे नाशिकच्या जागेसाठी महामंत्री चौधरींकडे ठिय्या आंदोलन

Political News : भाजप कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे नाशिकची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला सोडल्यास भाजपचे पदाधिकारी किती काम करतील, असा प्रश्न आता यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांपैकी दिंडोरीची जागा भाजपसाठी निश्चित झाली असताना नाशिक संदर्भात मात्र अद्याप निर्णय होत नाही. सर्वेक्षणामध्ये भाजप उमेदवार आघाडीवर असताना नाशिकची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला सोडले जाणार असल्याच्या शक्यतेने भाजप पदाधिकाऱ्यांनी आज पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्यासमोरच ठिय्या आंदोलन करत ‘नाशिकचा खासदार कमळाचा’ अशा घोषणा देत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. (Nashik Lok Sabha Election) भाजप कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे नाशिकची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला सोडल्यास भाजपचे पदाधिकारी किती काम करतील, असा प्रश्न आता यानिमित्ताने निर्माण झाला आहे. (Nashik Lok Sabha Election 2024 BJP protest to for MP seat)

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आहे. सात टप्प्यांत देशात निवडणुका होणार असून, महाराष्ट्रात एप्रिल व मे या दोन महिन्यांत निवडणुका होतील. उमेदवार निश्चित संदर्भात भाजपने आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रात मात्र महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला किती व कोणत्या जागा सोडायच्या याबाबत निश्चितता नाही.

भाजपने पहिली यादी जाहीर करत बहुतांश जागी पूर्वीच्याच खासदारांना उमेदवारी जाहीर केली. नाशिक संदर्भात मात्र निर्णय झालेला नाही. दिंडोरीतून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. दुसरीकडे नाशिकच्या जागेवर महायुतीचा घटक असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाने थेट उमेदवारी जाहीर केली आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसदेखील नाशिकच्या जागेसाठी प्रयत्नशील आहे. अशा परिस्थितीमध्ये आता भाजपच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी देखील उडी घेतली. नाशिकची जागा भाजपकडे असावी, यासाठी अनेक दिवसांपासून लॉबिंग सुरू आहे. नाशिकच्या जागेसंदर्भात अध्याप निर्णय झालेला नसताना शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकची जागा शिंदे गटाकडेच राहील व खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळेल, अशी घोषणा केल्यानंतर भाजपमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. (latest marathi news)

त्याच पार्श्वभूमीवर आज नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात बोलविण्यात आली. पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीला चौधरी उपस्थित झाल्यानंतर जगदीश पाटील, धनंजय माने, अनिल भालेराव, कुणाल वाघ, जगन पाटील, सचिन हांडगे आदींनी व्यासपीठाच्या बाजूलाच ठिय्या आंदोलन केले. ‘नाशिकचा खासदार कमळाचाच’ अशा जोरदार घोषणा देत नाशिकच्या जागेची मागणी केली. नाशिकचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता भाजपला नाशिकची जागा न सोडल्यास अन्नत्याग करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

आंदोलनाचा पवित्रा कायम

भाजपच्या पक्ष कार्यालयात नाशिकची जागा पक्षाला मिळावी, यासाठी प्रथमच आंदोलन झाले. ‘नाशिकचा खासदार कमळाचाच’ अशा घोषणा जवळपास अर्धा तास सुरू होत्या. चौधरी यांनी पक्षश्रेष्ठींकडे भावना कळवू, असे आश्वासन दिल्यानंतरही पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: संविधान नसतं तर..? राहुल गांधींनी फुले आंबेडकरांची आठवण काढत केली RSS वर टीका

0.05 सेकंद, 2 सेंटीमीटर... Trump यांच्यावर गोळीबार; अमेरिकेच्या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट कसा ठरला?

Supreme Court : तुमच्याकडे कारचे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर... सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अनेकांना होणार फायदा

लग्नाच्या १३ वर्षांनंतरही मुल का नाही? सतत एकच प्रश्न विचारणाऱ्यांना प्रिया बापटचं रोखठोक उत्तर, म्हणाली- मी आता..

'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! कांटे की टक्कर अन् काटाजोड लढती; कोल्हापुरातील 'या' दहा मतदारसंघांत काय स्थिती?

SCROLL FOR NEXT