Police Commissioner Sandeep Karnik after the postal voting process. esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election 2024: पोलीस आयुक्तांनीही बजावला मतदानाचा हक्क! ‘पोस्टल मतदाना’नंतर सोशल मीडियावर केले फोटो व्हायरल

Lok Sabha Election 2024 : आयुक्तांनी स्वत: पोस्टल मतपत्रिकेद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावत जागरुक नागरिक असल्याचे दाखवून दिले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election 2024 : पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिककरांना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याचे आवाहन सोशल मीडियावरून केले होते. तर, आयुक्तांनी स्वत: पोस्टल मतपत्रिकेद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावत जागरुक नागरिक असल्याचे दाखवून दिले. (Nashik Lok Sabha Election 2024 Police Commissioner cast his right to vote)

नाशिक लोकसभा मतदार संघासाठी सोमवारी (ता.२०) मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाच्या दिवशी नोकरदार मतदारांना सुट्टी तर, खासगी नोकरदारांना कंपन्यांकडून किमान दोन तासांची सुट्टीही दिली गेली. परंतु तरीही बहुतांशी मतदार हे मतदान करण्याऐवजी पर्यटन करण्यासाठी परगावी जातात.

या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दोन दिवसांपूर्वीच सोशल मीडियाद्वारे नाशिककरांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला सोशल मीडियावरील सुमारे दीड-पावणे दोन लाख व्हिव्युज मिळाले होते. (latest marathi news)

तसेच, आयुक्त कर्णिक हे मुंबईतील मुलूंड येथील मतदार आहेत. नाशिक व मुंबईत एकाच दिवशी मतदानाची प्रक्रिया होती. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी पोस्टल मतदान प्रक्रियेचा लाभ घेतला आणि मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यासंदर्भातील फोटो आयुक्तांनी सोशल मीडियावरील शहर पोलीस आयुक्तालयाच्या ‘एक्स’, फेसबुक, इन्स्ट्राग्राम हॅण्डलवर व्हायरल केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

SCROLL FOR NEXT