Bhaskar Bhagare esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election 2024 Result : भगरे यांच्या विजयाने ‘राष्ट्रवादी’चा वनवास संपला! पहिल्या निवडणुकीत भगरे दिल्लीत

Nashik News : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात केंद्रात पहिल्यांदाच संधी मिळालेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री व भारतीय जनता पक्षाच्या खासदार डॉ. भारती पवार यांना मतदारांनी नाकारले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कांदा प्रश्नामुळे देशाचे लक्ष लागलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात केंद्रात पहिल्यांदाच संधी मिळालेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री व भारतीय जनता पक्षाच्या खासदार डॉ. भारती पवार यांना मतदारांनी नाकारले. पहिल्या फेरीपासून महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे भास्कर भगरे यांनी मतांमध्ये घेतलेली आघाडी अखेरच्या फेरीपर्यंत कायम ठेवली. (Nashik Lok Sabha Election 2024 Result)

भगरे यांनी डॉ. पवार यांचा तब्बल एक लाख १३ हजार १९९ मतांनी पराभव केला. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांचा पराभव हा भाजपला मोठा धक्का आहे. शिक्षक असलेले भगरे यांच्या झालेल्या विजयाने ‘राष्ट्रवादी’ची मतदारसंघ काबीजची स्वप्नपूर्ती झाली असून, भगरे यांना लोकसभेच्या पहिल्याच निवडणुकीत दिल्लीला पोहोचविले आहे.

दिंडोरी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी (ता. ४) अंबड औद्योगिक वसाहतीतील वखार महामंडळाच्या गुदामात झाली. पोस्टल मतदानाने मतमोजणीस प्रारंभ झाला. यात भगरे यांना दोन हजार ४८, तर डॉ. पवार यांना एक हजार ८०७ मते मिळाली. या मोजणीनंतर ईव्हीएममधील मतांच्या मोजणीला सुरवात झाली.

पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे भगरे यांनी एक हजार २६० मतांची आघाडी घेतली. पहिल्या फेरीपासून सुरू झालेली ही आघाडी अखेरच्या फेरीपर्यंत कमी-अधिक फरकाने कायम होती. भगरे यांनी मतांमध्ये घेतलेला लीड अखेरपर्यंत डॉ. पवार यांना मोडता आला नाही. फेरीनिहाय हा लीड वाढत-वाढत गेला. त्यामुळे भगरे हे अखेरपर्यंत आघाडीवर राहिले.

भाजपने पहिल्याच उमेदवाराच्या यादीत डॉ. पवार यांना उमेदवारी जाहीर केली होती. प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून कांदा अन शेतकरी प्रश्नावरून डॉ. पवार यांच्यासह भाजपची कोंडी केली. यातच, पक्षांतर्गतही कांदा प्रश्नावरही पदाधिकाऱ्यांनी धास्ती व्यक्त केली होती. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घ्यावी लागली. मात्र, कांदा प्रश्नच या सभेच्या केंद्रस्थानी राहिला. शेतकऱ्यांमधील रोष कमी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीहगू सभा झाली. (latest marathi news)

ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांनीदेखील दोन सभा घेतल्या. महायुतीची ताकद असली, तरी मतदानापर्यंत हा असमन्वय कायम राहिला. तो समन्वय साधण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः बैठक घेत नांदगावला सभा घेतली. भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन तळ ठोकून होते. मात्र, प्रतिष्ठा पणाला लावूनही पक्षाला येथे यश मिळविता आले नाही. असे असताना ‘राष्ट्रवादीच्या शरद पवार यांनी अनेक इच्छुकांना डावलत सर्वसामान्य व एकनिष्ठ असलेल्या भगरे यांना उमेदवारी दिली.

पवार यांनी दिलेल्या उमेदवाराच्या मागे, मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्रित ताकद लावली. त्यासाठी महाविकास आघाडीची एकजूट करण्यातही राष्ट्रवादीला यश मिळाले. भगरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून यंदाची निवडणूक लोकांनी हातात घेतली होती. याचाच फायदा उचलत, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मतदारसंघात व्यूहरचना आखत रान पेटविले. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या माकपची उमेदवारी मागे घेत.

त्यांना सोबत ठेवण्यात शरद पवार यांनी घेतलेला पुढाकार कामी आला. शरद पवार यांनी शेतक-यांमधील असलेली नाराजी हेरत, सभा घेतल्या. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, माजीमंत्री अनिल देशमुख यांच्या सभा घेत वातावरण निर्मिती केली. याची परिणिती मतात परिवर्तीत करण्यात राष्ट्रवादी यशस्वी ठरली.

"आदिवासी मतदारसंघ असून, येथे शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न होते. सत्ताधाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शरद पवार यांनी सर्वसामान्यांला दिलेली उमेदवारी शेतकऱ्यांना आपली उमेदवारी वाटली. त्यामुळे मतदारांनी निवडणूक हातात घेत मला साथ दिली. मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी तसेच पाणी, आरोग्य यावर काम करणार आहे." - भास्कर भगरे, नवनिर्वाचीत उमेदवार, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ

फूटीनंतर, राष्ट्रवादीला भरीव यश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर, पक्षाचे नेते छगन भुजबळ यांसह जिल्ह्याचे पाचही आमदार यांनी अजित पवार यांच्या गटात गेले. त्यामुळे पक्ष संघटनेतील अनेकांनी पवार यांची साथ सोडली. या परिस्थितीत पवार यांनी आहे त्या पदाधिकारी अन कार्यकर्त्यांची एकजुठ ठेवत, त्यांना निवडणुकीत उतरवले.

जेष्ठ नेते श्रीराम शेटे, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, दत्तात्रय पाटील, सयाजी गायकवाड, गजानन शेलार या शिलेदारांवर निवडणुकीची धुरा सोपवली. शेटे यांनी सर्वांना सोबत घेऊन, महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुठ बांधत प्रचाराची धुरा सांभाळली. सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहचत, लोकांमध्ये गेले. त्यामुळे पक्षाची संघटना कमकुवत असताना देखील भगरे यांच्या विजयाने पक्षाला भरीव यश मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Latest Maharashtra News Updates live : महाराष्ट्रात चोरांचे सरकार,मल्लिकार्जुन खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT