Young Voters esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election 2024: सिन्नरला 1 लाख 28 हजार युवा मतदार! शंभरीपार 143 तर 4019 नव मतदारांची नोंद

Political News : चाळीशी पर्यंतच्या वयोगटातील युवा मतदारांची संख्या सिन्नरमध्ये एक लाख २८ हजार ३८८ इतकी असून एक लाख १९ हजार ६३८ मतदार साठीच्या आतले आहेत

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : नाशिक लोकसभा मतदारसंघात सिन्नर तालुक्यातील सहा व इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद गटात तीन लाख पाच हजार ९८२ इतके मतदार असून त्यात एक लाख ६० हजार ७८५ पुरुष आणि एक लाख ४५ हजार १९६ महिला मतदारांचा समावेश आहे. सिन्नर मतदारसंघात एक तृतीयपंथी मतदाराची देखील नोंद झाली आहे. (Nashik Lok Sabha Election 2024 Sinnar news)

चाळीशी पर्यंतच्या वयोगटातील युवा मतदारांची संख्या सिन्नरमध्ये एक लाख २८ हजार ३८८ इतकी असून एक लाख १९ हजार ६३८ मतदार साठीच्या आतले आहेत. १८ ते १९ वयोगटातील ४०१९ नवमतदार असून त्यात एका तृतीयपंथी मतदाराचा समावेश आहे. हे सर्व मतदार पहिले मतदान करणार आहेत.

सिन्नर तहसील निवडणूक शाखेच्या आकडेवारीनुसार २० ते ३९ वयोगटातील मतदारांची संख्या एक लाख २४ हजार ३६९ एवढी आहे. ४० ते ५९ वयोगटात एक लाख १९ हजार ६३८ इतके मतदार असून साठीपार असलेले ३७ हजार ७५४ मतदार ज्येष्ठांच्या यादीत आहेत. ८० ते ८९ वयोगटात असलेल्या मतदारांची संख्या २५ हजार ८९७ इतकी आहे. (latest marathi news)

तर शंभरीच्या घरात असलेले १८९१ मतदार सिन्नरमध्ये आहेत. १०० ते १०९ वयोगटातील १४३ मतदार असून त्यांच्यासाठी पहिल्यांदाच घरात मतदान केंद्राची व्यवस्था केली जाणार आहे. शंभरीपार वयोगटातील मतदारांनी मागणी केल्यानंतर ही पूर्तता केली जाईल. मात्र ही मतदान प्रक्रिया टपाली स्वरूपाची असल्याने त्यास कितपत प्रतिसाद मिळतो हे प्रत्यक्ष मतदानावेळी समजेल.

प्रत्येक निवडणुकीत युवा मतदारांची संख्या निर्णायक असते. नाशिकमध्ये मेच्या शेवटात मतदान होणार आहे. या काळात तापमान चाळिशी पार जाण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत युवा मतदार सहजपणे मतदान केंद्रापर्यंत येऊ शकतात. मात्र ज्येष्ठ व वृद्ध मतदारांना होऊ शकतो. या बाबी विचारात घेऊन उमेदवारांना व त्यांच्या समर्थकांना साठीपार मतदारांसाठी घरापासून मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी नियोजन करावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT