Nashik Lok Sabha Election esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : नाशिक, दिंडोरीसाठी 20 मे रोजी मतदान; आचारसंहिता लागू

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. ४ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. २६ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज स्वीकृती होणार असून ३ मे पर्यंत अर्ज भरता येतील. ऑनलाईन अर्ज भरावे लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Nashik Lok Sabha Election 2024 Voting for Nashik and Dindori on May 20 marathi news)

जिल्हाधिकारी शर्मा हे नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी असतील. तर दिंडोरीसाठी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील. अर्ज स्वीकृती जिल्हाधिकारी कार्यालयातच होईल. दरम्यान निवडणूकीची घोषणा होताच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून याबाबतच्या सूचना देण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचीही बैठक घेण्यात आली.

त्यात त्वरित बॅनर, फ्लेक्स आणि राजकीय पक्षांचे झेंडे काढून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा शासकीय यंत्रणेकडून ते काढण्यात येतील व त्याचा खर्च संबधित पक्ष आणि उमेदवारांच्या खात्यातून आकारला जाईल. ६ जून पर्यंत आचारसंहिता लागू राहणार असल्याने त्याचे पालन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. आचारसंहिता अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात विविध पथकांची स्थापना केली आहे. तसेच सोशल मिडियावरील प्रचारावरही नियंत्रणासाठी मिडिया सेल स्थापित केला आहे. (latest marathi news)

निवडणूक कार्यक्रम -

नामनिर्देशनपत्र दाखल करणे - २६ एप्रिल ते ३ मे (सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत)

अर्ज छाननी - ४ मे (सकाळी११ वाजेपासून )

अर्ज माघारी - ६ मे (सकाळी ११ पासून)

मतदान - २० मे (सकाळी ७ ते ६ वाजेपर्यंत)

मतमोजणी -४ जून (सकाळी ८ वाजेपासून)

मतदान केंद्र -

नाशिक - १९०८ केंद्र असून सहाय्यकारी १४ केंद्र मिळून १९२२ केंद्र आहेत.

दिडोरी - १८७६ केंद्र असून, सहाय्यकारी ३४ केंद्र मिळून १९१० केंद्र आहेत.

वंचित मतदारांना नाव नोंदणीची संधी

ज्या मतदारानी अद्यापही नाव नोंदविले नाही, अशा मतदारांना अद्यापही संधी आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीच्या १० दिवस आधीपर्यंत अर्ज भरल्यास नाव नोंदविता येईल. यादीतील नावाबाबत वोटर हेल्पलाईन अॅप तसेच ईसीआयच्या पोर्टलवरुनही माहितीसह नोंदणी करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai School : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी, काय आहे कारण? घ्या जाणून!

Sakal Podcast: जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक ते विम्याचे पैसे लाटण्यासाठी युवक बनले अस्वल

SCROLL FOR NEXT