BJP, NCP (Sharadchandra Pawar)  esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : शहरात फुलले कमळ; गावाकडे वाजली तुतारी! कांदा उत्पादकांच्या परिसरात भाजपला मताधिक्य

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीनंतर गावोगावी आता कुठे कुणाला मताधिक्य आणि कोणाची पिछाडी याचे कवित्व सुरूच आहे.

संतोष विंचू

येवला : लोकसभा निवडणुकीत येवला मतदारसंघाने यावर्षी संमिश्र कौल दिल्याने अंदाज लावणाऱ्यांचेही अंदाज गुल झाल्याने भविष्यातल्या परिस्थितीतचा व राजकीय स्थित्यंतरांचा अंदाज घेणे भल्याभल्यांना कठीण होत आहे. लोकसभा निवडणुकीत आरक्षित उमेदवार असले तरी मतदारसंघात जातीय समीकरणांचा पगडा दिसून आला. (Nashik Lok Sabha Election)

त्यामुळेच कुठे कमळ फुलले, तर कुठे तुतारीचा निनाद निघाला. विशेष म्हणजे येवला, विंचूर, लासलगाव, अंदरसूलसारख्या मोठ्या शहरांनी भाजपला साथ दिल्याचे आकडे सांगतात. लोकसभा निवडणुकीनंतर गावोगावी आता कुठे कुणाला मताधिक्य आणि कोणाची पिछाडी याचे कवित्व सुरूच आहे. अर्थात, पक्ष वर्चस्व मोडून काढत ही निवडणूक वेगळ्या वळणावर गेल्याने गेल्याचे आकडेवारीतून दिसून येते.

मतदारसंघात विशेषत: येवला शहर जनसंघाचे गाव असून, आजही भाजपचा पारंपारिक मतदार शहरात आहे. शिवाय हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तरुण पिढीही भाजपकडे आकृष्ट होत आहे. त्याचवेळी एक गठ्ठा मुस्लिम मतदारही जागृत होताना दिसल्याने यावेळी शहरातून भाजपची आघाडी काहीशी कमी होताना दिसली. शिवसेना व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी मतदारसंघाची ओळख आहे. मात्र, केंद्र व राज्य शासनाच्या सत्तेचा फायदा गावोगावी काही अंशी होऊन नव्याने कार्यकर्ते तयार होत आहेत.

अमृता पवार, बाबा डमाळे, आनंद शिंदे, समीर समदडिया, मनोज दिवटे, प्रमोद सस्कर, राजू परदेशी, नाना लहरे, दत्ता सानप आदी असंख्य पदाधिकारी सक्रिय असल्याने भाजपचे संघटन वाढत आहे. शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग शेळके, शहराध्यक्ष अतुल घाटे यांचीही साथ मिळाली. हिंदू व मोदी घटकांचा परिणाम दिसल्याने डॉ. भारती पवारांच्या मताधिक्यातून दिसून आले आहे. (latest marathi news)

विशेष म्हणजे या मतदारसंघात ज्येष्ठ नेते शरद पवारांना मानणाराही मोठा वर्ग असून, राखीव जागेवरील ही निवडणूक असली तरी पवारांचा करिष्मा आजही दिसून आला आहे. किंबहुना पवारांना मानणाऱ्या गावांमध्ये हे चित्र दिसून आले. स्थानिक नेत्यांनीही कंबर कसल्याचा परिणाम आकड्यातून दिसला. येथील मंत्री छगन भुजबळ काहीसे अलिप्त असल्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला आहे.

त्याचवेळी ज्येष्ठनेते माणिकराव शिंदे, आमदार नरेंद्र दराडे, युवानेते माजी सभापती संभाजीराजे पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख नेते कुणाल दराडे, माजी सभापती संजय बनकर या सर्वांच्या प्रयत्नांना मोठे यश आल्याचे ग्रामीण भागातील आकडेवारीवरून दिसून येते. किंबहुना राष्ट्रवादी शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या गट-गणातील गावातही महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना मिळालेले मताधिक्य खूप काही सांगून जाते.

शेतकरी नाराज असल्याचे जोरदार चर्चा झाली मात्र अनेक शेतकऱ्यांच्या गावातच भाजपाला मोठे मताधिक्य दिसून आले आहे.त्यामुळे ही निवडणूक भाजपा विरोधी असल्याची चर्चा असली तरी भाजपला मिळालेले अनेक गावांमधील वर्चस्व दुर्लक्ष चालणार नाही.

बाबू सरांचीही गाडी सुसाट!

येवला मतदारसंघ सुशिक्षितांचा समजला जातो. येथील साक्षरतेचा दरही चांगला आहे. असे असताना महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्याशी नामसाधर्म्य असलेल्या भास्कर भगरे सर या डमी उमेदवाराला देखील मतदार संघातून तब्बल १६ हजार मते मिळाली आहे. त्यामुळे अजूनही मतदारांमध्ये किती अज्ञान आहे हे दिसते.

प्रमुख गावात मिळालेली मते

गाव : डॉ. भारती पवार - भास्कर भगरे

येवला - १२७९९ - ११८४८

लासलगाव - ४६३८ - २९०१

विंचूर - ३०४० - २३५१

सोमठाण देश - ३०९ - ९७२

अंदरसूल - ३५४२ - १९६०

मुखेड - १०८२ - १४६३

वेळापूर - ६३४ - २३२

पिंपळगाव नजीक - १६१५ - १०५९

टाकळी विंचूर - १२५५ - ११६७

खडक माळेगाव - ७३९ - १६९१

वनसगाव - ५२४ - ११८९

कोटमगाव - ६८४ - ६७५

ब्राम्हणगाव वि. - ५२३ - ४७०

पाचोरे बुद्रूक - ७५७ - २२७

आडगाव रेपाळ - ३४७ - ६९२

कुसुर - २५१ - ५४४

कुसमाडी - २२१ - ६५२

हडप सावरगाव - ९८ - ४३२

जायदरे - ५० - ३६४

राजापूर - १०२८ - ७०५

नगरसूल - १७२६ - २२६९

धामोडे - १८० - ७४२

सावखेडे - २१ - ३६९

सावरगाव - ३२४ - १०४५

पाटोदा - १५६७ - १२३६

गोंदेगाव - ५२८ - ५२४

धुळगाव - ५३१ - ८९३

सायगाव - ७४६ - ८३१

नागडे - ८४५ - ४९८

अंगणगाव - ५३८ - ४०१

नेऊरगाव - ४०६ - ७५१

नांदूरमध्यमेश्‍वर - ८५८ - ११०६

खेडले झुंगे - ७७१ - ७२५

सुरेगाव रस्ता - ५४४ - ३७४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT