Nashik Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, येत्या काही दिवसांत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांना मालमत्तेतील बँक खात्यांच्या तपशीलासोबतच, समाजमाध्यमांवरील खात्याचा तपशील देखील नमूद करावा लागणार आहे. (Nashik lok sabha election close look at candidates social media marathi news)
तसेच सोशल मीडियावर जाहिरातीपोटी केलेल्या खर्चावरही आता लक्ष ठेवले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात दिलेल्या सूचनानुसार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्जात त्यांच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्सचा तपशील नमूद करणे आवश्यक असेल. उमेदवार आणि राजकीय पक्षांनी सोशल मीडियाद्वारे केलेला जाहिरातीवरील खर्च त्यांच्या खर्चाचे हिशोबात दाखविणे आवश्यक आहे.
उमेदवार आणि राजकीय पक्ष यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या राजकीय जाहिराती तसेच संदेश याबाबत आदर्श आचारसंहितेच्या तरतुदी लागू राहातील. इलेक्ट्रॅानिक मीडियावर करावयाच्या प्रचार जाहिरातीसाठी माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीची मान्यता घेऊनच अशा जाहिराती प्रसारित करता येईल. याकरिता जिल्हास्तरावर समिती गठित केली आहे. या समितीची प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाद्वारे करण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातींवर करडी नजर राहणार आहे. (latest marathi news)
समाजविघातक पोस्टवर असेल लक्ष
जिल्हास्तरावर मीडिया सेल कार्यान्वित केला असून पोलिस सायबर विभागाचे तज्ज्ञ अधिकारी या सेलमध्ये कार्यरत असणार आहेत. या सेलचे सोशल मीडियाद्वारे करण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातीवर लक्ष असेल. सोशल मीडियाद्वारे मानहानिकारक संदेश पाठवणे, धार्मिक भावनांना धक्का पोचवणारे, भावना भडकावणारे, समाजातील शांतता, एकोप्यास तडा देणारे विघातक संदेश पाठवणे आदी समाजविघातक बाबींवर या सेलचे विशेष लक्ष असेल.
धार्मिकस्थळे, पूजास्थळांचा प्रचारासाठीच्या वापरावर बंदी
राजकीय पक्ष व उमेदवारांनी इंटरनेटद्वारे केल्या जाणाऱ्या प्रचारावरदेखील आदर्श आचारसंहितेच्या तरतुदी लागू आहेत. राजकीय पक्ष व उमेदवारांना मतदारांना जात, धर्मावर आधारित मतदान करण्याबाबत आवाहन करता येणार नाही.
त्याचप्रमाणे धार्मिक स्थळे, पूजास्थळांचा वापर निवड़णूक प्रचारासाठी करता येणार नाही. सोशल मीडियावरून करण्यात येणाऱ्या जाहिरातीद्वारे वाईट भाषा आणि मानहानिकारक भाषा वापरून निवड़णूक प्रचार करता येणार नाही, असेही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.