Nashik Lok Sabha Election esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : काँग्रेसच्या मैदानात शिवसेनेचा चौकार; नाशिक लोकसभा

Lok Sabha Election : लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून काँग्रेसला साथ देणाऱ्या नाशिक लोकसभा मतदारसंघात आठ वेळा या पक्षाच्या खासदारांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून काँग्रेसला साथ देणाऱ्या नाशिक लोकसभा मतदारसंघात आठ वेळा या पक्षाच्या खासदारांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. विठ्ठलराव हांडे यांनी भारतीय लोक दलाच्या (बीएलडी) माध्यमातून काँग्रेसला पहिले खिंडार पाडले. त्यानंतर शिवसेना चार वेळा, राष्ट्रवादी काँग्रेस दोन वेळा आणि भाजपला या मतदारसंघाने एकदा संधी दिली. (nashik lok sabha election Congress maintained its supremacy by winning four times marathi news)

कै. भानुदास कवडे व विद्यमान खासदार हेमंत गोडसे या दोघांव्यतिरीक्त या मतदारसंघातून एकाही खासदाराला पुन्हा संधी मिळालेली नाही. नाशिक लोकसभा मतदारसंघ नेहमीच परिवर्तनाला चालना देणारा ठरला आहे. नाशिक जिल्ह्यातून एकच खासदार निवडला जात होता तोपर्यंत काँग्रेसचा प्रभाव मतदारांवर असल्याचे पूर्व इतिहासातून जाणवते. यशवंतराव चव्हाण यांना बिनविरोध निवडून दिल्यानंतर काँग्रेसला सलग तीन वेळा विजय मिळाला.

बीएलडीच्या माध्यमातून विठ्ठलराव हांडे यांनी काँग्रेसला पहिल्यांदा खिंडार पाडले. त्यांनी ॲड.बाबुराव ठाकरे यांना पराभूत केले. त्यानंतरही काँग्रेसने चार वेळा विजय मिळवून पक्षाचे वर्चस्व कायम राखले. राजाभाऊ (राजाराम) गोडसे यांनी पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा फडकवला. तर त्यांचे पुतणे हेमंत गोडसेंनी सलग दोन वेळा (२०१४,२०१९) विजय मिळवत इतिहास घडवला.

शहरातील नाशिक पूर्व, मध्य व पश्‍चिम या तीन मतदारसंघांसह देवळाली, सिन्नर व त्र्यंबकेश्‍वर-इगतपुरी या सहा विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश आहे. यात २०१९ च्या निवडणुकीपूर्वी खुल्या प्रवर्गाचे ३१.१८ टक्के, ओबीसींचे २८.४७ टक्के, अनुसूचित जाती १०.८५ टक्के व इतर जातींचे ११.३० टक्के मतदार आहेत. त्यामुळे ओबीसी व खुल्या प्रवर्गाची महत्वाची भूमिका राहते.

शहरातील मतदारांचा कौल महत्वाचा

नाशिक लोकसभेत समाविष्ट होणाऱ्या त्र्यंबकेश्‍वर-इगतपुरी हा मतदारसंघ आदिवासी बहुल लोकसंख्या जास्त प्रमाणात आहे. टाकेद, गिरणारे, मखमलाबाद,सातपूर, मांडसांगवी, शिंदे, देवळाली, भगूर या मंडळ क्षेत्रांसह नाशिक महापालिका क्षेत्रातील मतदारांचा कौल जाणून घेणारा हा मतदारसंघ आहे. यात जाधव, पवार, शेख, पाटील व शिंदे या आडनावाची सर्वाधिक मतदार राहत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. (latest marathi news)

वर्ष..........खासदाराचे नाव (मते)...................प्रतिस्पर्धी उमेदवार (मते)

१९६२...गोविंद देशपांडे, काँग्रेस(१,१०,२४२)....भाऊराव गायकवाड,आरईपी(५०५८८)

१९६३...यशवंतराव चव्हाण, काँग्रेस................बिनविरोध

१९६७...भानुदास कवडे, काँग्रेस(१५५६३२)...बी. के. गायकवाड, आरपीआय(११९३२५)

१९७१...भानुदास कवडे, काँग्रेस(२०८८९८)..धैर्यशीलराव पवार, बीकेडी(६३१५७)

१९७७...विठ्ठलराव हांडे, बीएलडी(१६४२५८)...बाबुराव ठाकरे, काँग्रेस(१५३०१७)

१९८०...प्रताप वाघ, काँग्रेसआय(२०४१५५)...विनायकराव पाटील, काँग्रेसयु (१५७९००)

१९८४...मुरलीधर माने, काँग्रेस(१९७४२८).....प्रल्हाद पाटील, आयसीएस (१५९९००)

१९८९...डी. एस. आहेर, भाजप(२८७२६७)............मुरलीधर माने, काँग्रेस(२५६६१४)

१९९१....वसंत पवार, काँग्रेस(३१०२४७)..............डी. एस. आहेर, भाजप(१६८८८१)

१९९६...राजाराम गोडसे, शिवसेना(२९५०४४).....वसंत पवार, काँग्रेस(२२१५०५)

१९९८...माधवराव पाटील, काँग्रेस(३८१३००)....राजाराम गोडसे, शिवसेना(२७८९०८)

१९९९..उत्तमराव ढिकले, शिवसेना(३०३०८४)..माधवराव पाटील, राष्ट्रवादी(२६६२७२)

२००४...देविदास पिंगळे, राष्ट्रवादी(३०७६१३)...दशरथ पाटील, शिवसेना(२९२५५५)

२००९...समीर भुजबळ, राष्ट्रवादी(२३८७०६).....हेमंत गोडसे, मनसे(२१६६७४)

२०१४..हेमंत गोडसे, शिवसेना(४९४७३५).........छगन भुजबळ,राष्ट्रवादी(३०७३९९)

२०१९...हेमंत गोडसे, शिवसेना( ५६३५९९)......समीर भुजबळ, राष्ट्रवादी(२७१३९७)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai School : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी, काय आहे कारण? घ्या जाणून!

Sakal Podcast: जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक ते विम्याचे पैसे लाटण्यासाठी युवक बनले अस्वल

SCROLL FOR NEXT