Lok Sabha Election 2024  esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : काँग्रेसचा बालेकिल्ला बनला भाजपचा गड; दिंडोरी मतदारसंघ

Lok Sabha Election : लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या अनुसूचीत-जमाती साठी राखीव असलेला आत्ताचा दिंडोरी तर पुर्वीचा मालेगाव लोकसभा मतदारसंघ आता भाजपचा बालेकिल्ला बनला आहे.

सकाळ वृत्तसेवा

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या अनुसूचीत-जमाती साठी राखीव असलेला आत्ताचा दिंडोरी तर पुर्वीचा मालेगाव लोकसभा मतदारसंघ आता भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. आतापर्यंतच्या १७ निवडणुकांमध्ये आठ वेळा काँग्रेसला विजय मिळाला. मालेगाव मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर मात्र तयार झालेल्या दिंडोरी मतदारसंघात मुस्लिम मतांची वजावट झाल्याने भाजपला संधी मिळाली. (Nashik Lok Sabha Election Congress stronghold has become BJP stronghold marathi news)

सन २००४, २००९, २०१४, २०१९ मध्ये भाजपने एकहाती विजय मिळविला. प्रजा सामाजिक पक्ष व जनता दल पक्षालाही मतदारसंघाने संधी मिळाली. पूर्वीच्या मालेगाव मतदारसंघात सन १९५७ च्या निवडणुकीपासून काँग्रेसला विजय मिळाला. यादव नारायण जाधव, एम.एल. जाधव यांनी एकदा तर झेड. एम. कहांडोळे यांनी पाच वेळा विजय मिळविला. सन १९७७ च्या निवडणुकीत हरिभाऊ महाले यांच्या रूपाने प्रथमच जनता पक्षाने विजय संपादन केला.

मात्र, त्यानंतर झालेल्या सन १९८० च्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा हा मतदारसंघ आपल्याकडे खेचला. सन १९८४ मध्ये सिताराम भोये यांनी काँग्रेसच्या लाटेत विजय मिळविला होता. सन १९८९ मध्ये हरिभाऊ महाले यांच्या माध्यमातून जनता दल पक्षाने येथे खाते उघडले. त्यानंतर आलटून पालटून काँग्रेस व भाजपने हा मतदार संघ जिंकला. सन १९९९ मध्ये जनता दल (निरपेक्ष) च्या माध्यमातून महाले दिल्लीला पोहचले.

सन २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आलेले हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी निवडणुकीत बाजी मारली. सन २००८ मध्ये मालेगाव लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. यातून दिंडोरी लोकसभा मतदार अस्तित्वात आला. नव्याने अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघात सन २००९ मध्ये भाजपने झेंडा फडकविला. त्यानंतर झालेल्या २०१४ व २०१९ मध्ये भाजपने हा मतदारसंघ राखला. (latest marathi news)

त्यामुळेच निर्मितीपासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात राहिल्याने भाजपचा गड झाला. सन २०१९ च्या निवडणुकीत माजी खासदार चव्हाण यांचे तिकीट कापून राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या डॉ. भारती पवार यांना पक्षाने संधी देत रिंगणात उतरविले. या निवडणुकीत त्या विजयी होऊन दिल्लीत पोहचल्या. या निमित्ताने त्यांना नाशिक जिल्ह्यात पहिल्या महिला खासदार होण्याचा मान मिळाला.

जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीत चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार आहे. पहिल्याच टर्ममध्ये भाजपाने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्रीपदाची जबाबदारी दिलेल्या खासदार डॉ. भारती पवार यांना पुन्हा संधी दिली आहे. हा मतदारसंघ निर्माण झाल्यापासून तीन निवडणुकांत भाजपचेच खासदार निवडून आलेले आहेत. या मतदारसंघामध्ये आदिवासी समाजाच्या मतदारांची संख्या मोठी आहे. मतांच्या राजकारणात डाव्या पक्षांचेही याठिकाणी ब-यापैकी प्राबल्य आहे.

मतदारसंघाचा इतिहास

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निर्मिती २००८ मध्ये करण्यात आली. मालेगाव लोकसभा मतदारसंघातील भागाचा यात समावेश करण्यात आला. त्यात प्रामुख्याने नांदगाव, चांदवड, कळवण, निफाड, येवला आणि दिंडोरी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला आहे. २००९ मध्ये याठिकाणी पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक झाली. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे तीनही टर्ममध्ये याठिकाणी भाजपच्या उमेदवाराचाच विजय झाला आहे.

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष

पहिली लोकसभा १९५२-५७ - -

दुसरी लोकसभा १९५७-६२ यादव नारायण जाधव प्रजा सामाजिक पक्ष

तिसरी लोकसभा १९६२-६७ एम.एल. जाधव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

चौथी लोकसभा १९६७-७१ झामरू मंगळू कहांडोळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

पाचवी लोकसभा १९७१-७७ झामरू मंगळू कहांडोळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

सहावी लोकसभा १९७७-८० हरिभाऊ शंकर महाले जनता पक्ष

सातवी लोकसभा १९८०-८४ झामरू मंगळू कहांडोळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

आठवी लोकसभा १९८४-८९ सिताराम सयाजी भोये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

नववी लोकसभा १९८९-९१ हरिभाऊ शंकर महाले जनता दल

दहावी लोकसभा १९९१-९६ झामरू मंगळू कहांडोळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

अकरावी लोकसभा १९९६-९८ कचरुभाऊ राऊत भारतीय जनता पक्ष

बारावी लोकसभा १९९८-९९ झामरू मंगळू कहांडोळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

तेरावी लोकसभा १९९९-२००४ हरिभाऊ शंकर महाले जनता दल (निरपेक्ष)

चौदावी लोकसभा २००४-२००९ हरिश्‍चंद्र चव्हाण भारतीय जनता पक्ष

पंधरावी २००९-२०१४ हरिश्‍चंद्र चव्हाण भारतीय जनता पक्ष

सोळावी २०१४-२०१९ हरिश्‍चंद्र चव्हाण भारतीय जनता पक्ष

सतरावी २०१९-२०२४ डॅा. भारती प्रवीण पवार भारतीय जनता पक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai School : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी, काय आहे कारण? घ्या जाणून!

Sakal Podcast: जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक ते विम्याचे पैसे लाटण्यासाठी युवक बनले अस्वल

SCROLL FOR NEXT