health esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : मतदान केंद्रावर मिळणार प्राथमिक उपचार; जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी (ता.२०) मतदान होणार असून, जिल्हाभरातील मतदान केंद्रावर मतदारांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. उन्हाचा वाढता पारा, आजारी मतदारांसाठी मतदान केंद्रावर प्राथमिक उपचार पुरविले जाणार आहेत. याशिवाय आरोग्य पथकाचीही नियुक्ती केली आहे. (First aid will be provided at polling station due to summer )

राज्यात पूर्वी झालेल्या चार टप्प्यांत उन्हाच्या तडाख्यामुळे मतदानाची टक्केवारी काहीशी कमी झाल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. याचाच भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानेही मतदान केंद्रावर मतदारांच्या सोईसाठी प्राथमिक उपचार पुरविण्याबाबत प्रशासनाने निर्देश दिले.

तालुक्यातील मतदान केंद्रांवर आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना वेळेवर हजर राहण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. मतदारांना आवश्यकतेनुसार औषधोपचार व दिव्यांग, वृद्ध तसेच गरोदर व स्तनदा माता यांना विशेषत्वाने आरोग्य सेवा देण्याचे नियोजन केले आहे. (latest marathi news )

सर्व मतदान केंद्रनिहाय आरोग्य पथक स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आरोग्य पथकांची स्थापना करत, त्यांची नियुक्ती केली आहे. सर्व मतदान केंद्र येथील नियुक्त मतदान अधिकारी कर्मचारी व मतदानासाठी येणारे नागरिक यांना आरोग्य सेवा प्रत्येक मतदान केंद्रावर प्राथमिक उपचार औषधे व साहित्य उपलब्ध करावे, सर्व मतदान केंद्रावर आरोग्य पथक नेमणूक केलेली असावी,

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रनिहाय १०२ व १०८ रुग्णवाहिका उपलब्ध ठेवावे, सर्व मतदान केंद्रावर जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच रुग्णवाहिका क्रमांक व वाहनचालक यांचा दूरध्वनी क्रमांक बूथ प्रमुख यांच्याकडे यादी सादर करावी, दिव्यांग मतदार यांना आरोग्य पथकाने सर्व आवश्यक सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT