Nashik Lok Sabha Election : नाशिक लोकसभा निवडणुकीत उमेदवार निश्चितीचा घोळ मिटलेला नसताना नेत्यांनी मैदान गाजविण्यासाठी आत्तापासूनच बुकिंग सुरु केले आहे. राजकीय पक्षांना सर्वाधिक सोयीचे असलेले अनंत कान्हेरे मैदान अर्थात गोल्फ क्लबला एका दिवसाचे ३५ हजार रुपये भाडे आकारले जाते आणि तेवढीच अनामत रक्कम द्यावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी योजना सुरु केली आहे. (nashik lok sabha election leaders have already started booking to dominate field in Nashik Lok Sabha elections marathi news)
महापालिका क्षेत्रातील महत्वाच्या सात मैदानांवर सभा होतात. त्यादृष्टीने सर्व मैदानांचे दर निश्चित झाले असून, ‘एक खिडकी’कडून त्यांना अंतिम परवानगी दिली जाते. भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नाशिकला १८ मे रोजी जाहीर सभा होईल. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभांसाठी गोल्फ क्लब मैदान मिळावे, यासाठी महायुतीने तर ठाकरे गटाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेकरता मैदान मिळविण्यासाठी एनओसी मागितली आहे.
येत्या २० मे रोजी नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या मतदानाला महिन्यांहून अधिक काळ असला तरी राजकीय पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांच्या जाहीर सभांकरता मैदान मिळावे याकरता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गोल्फ क्लब अर्थात, अनंत कान्हेरे मैदान हे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणारे मैदान असल्याने जाहीर सभेच्या दृष्टीने ते सर्वांच्याच दृष्टीने योग्य ठरते.
यामुळे या मैदानासाठी पक्षांकडून आधीपासूनच नोंदणी करण्यासाठी चढाओढ लागलेली असते. अनंत कान्हेरे मैदानावर अनेक मातब्बर आणि बड्या नेत्यांच्या जाहीर सभा झालेल्या आहेत. यामुळे या मैदानाला तसा ऐतिहासिक वारसा देखील आहे. (latest marathi news)
मे महिन्यात सभांचा धडाका
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची नाशिकमध्ये पुढील महिन्यात दि. १५ एप्रिल रोजी जाहीर सभा होणार असून, त्यासाठी ठाकरे गटाने कान्हेरे मैदान मिळावे, याकरता मनपाच्या जाहिरात व परवाने विभागाकडे एनओसी मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा दि. १६ मे रोजी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा दि. १७ मे रोजी तर १८ मे रोजी भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे.
शहरातील महत्वाची मैदाने
मैदान....................भाडे.........जीएसटी..........अनामत.........एकूण......आकार चौ.फूट
गोल्फ क्लब...........२८८७५.......५१९८...........३५०००...........६१०७३.......४१२५००
ना. रोड शिखरेवाडी....१३२६२.....२३८७.........२००००..........३५६४९.......१८१४५०
शाळा क्र.१२५............८९५७........१६१२........१५०००..........२५५६९.......१२७९५९
सातपूर क्लब हाऊस..१८०८४......३२५५.......२५०००..........४६३३९.......२५८३३६
पवन नगर ….........३८१८..........६८७..........५०००............९५०५..........५४५४०
राजे संभाजी स्टेडीयम...२१९८०...३९५६......२५०००.......५०९३६...........३१४०००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.