Kalaram Mandir esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : प्रभु श्रीराम कोणाला पावणार? नेत्यांनी घेतले काळारामाचे दर्शन

Lok Sabha Election : ‘सियावर रामचंद्र की जय’चा नारा देत अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या मंदिराचे उद्‌घाटन होत असताना ज्यांना शक्य झाले नाही त्यांनी पंचवटीतील श्री काळारामाचे दर्शन घेतले.

योगेश मोरे : सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : ‘सियावर रामचंद्र की जय’चा नारा देत अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या मंदिराचे उद्‌घाटन होत असताना ज्यांना शक्य झाले नाही त्यांनी पंचवटीतील श्री काळारामाचे दर्शन घेतले. प्रभु श्रीरामाला दंडवत करून आरती केल्यानंतर आता पंचवटीतील श्रीराम कोणाला पावतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आरती करून राजकीय टच दिला खरा. (Nashik Lok Sabha Election Leaders took darshan of kalarama Whom will Prabhu Shriram accept in election)

त्यामुळे प्रभु श्रीराम आता कोणाला भरभरून दान देणार व कोणाची झोळी रिती ठेवणार याबद्दल उत्सुकता आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर अयोध्येत राममंदिरात रामल्ला मुर्तीची प्रतिष्ठापना झाली. सर्वत्र राममय वातावरण झाल्याने त्याचा राजकीय फायदादेखील करून घेतला गेला. अयोध्येत श्रीराम लल्लाची मुर्ती स्थापन करण्यापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री काळाराम मंदिरात महाआरती केली. पाठोपाठ शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे श्री काळाराम चरणी लिन झाले.

टप्प्याटप्प्याने नेते आले. महाआरतीचा घंटानाद नाशिकच्या आसमंतात दुमदुमला. मनसेचे राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, माजी पालकमंत्री गिरीष महाजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजप प्रदेक्षाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत असे अनेक नेत्यांनी मंदिरात हजेरी लावत श्री काळारामाची आरती केली.  (Nashik Political News)

एकंदरीत बघता ऐन निवडणुकीत या दर्शन सोहळ्याने राजकारणात नाशिकच्या प्रभु श्री काळाराम मंदिर चर्चेत आले. लोकसभा निवडणुकीत महायुती की इंडिया आघाडी सत्तेत येईल. हे निकालानंतर स्पष्ट होईल. राजकीय केंद्रबिंदू बनलेले प्रभू श्री काळाराम कोणत्या पक्षाला पावतील हे पाहणे देखील महत्वाचे ठरेल.

इच्छुकांनाही प्रभुची आस

लोकसभेसाठी नाशिकमधून जय बाबाजी भक्त परिवाराचे अर्थात, राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी शांतिगिरी महाराज इच्छुक आहेत. त्र्यंबकेश्वर येथील स्वामी सिद्धेश्वरानंद महाराजांनीदेखील प्रचार सुरू केला आहे. खासदार हेमंत गोडसे हे रामनवमीचे औचित्य साधतं दर्शनाला येवून गेले. त्यामुळे इच्छुकांना तरी राम पावतील का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT