मालेगाव : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच महानगरपालिका प्रशासन सक्रिय झाले आहे. मनपा क्षेत्राचे सर्व प्रमुख रस्ते, चौक व विविध भागातील १ हजार ६५६ बॅनर, झेंडे, फ्लेक्स जमा करण्यात आले. विविध विकास कामांच्या कोनशिला, कमानी, राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावे झाकण्यात आली आहेत.
मुख्य अग्निशमन केंद्र येथे ‘आचारसंहिता नियंत्रण कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. सर्व विभागप्रमुखांनी आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावे, विभाग प्रमुखांनी सोपविलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांनी केले. (Nashik Lok Sabha election malegaon municipal commissioner Ravindra Jadhav orders Strictly implement code of conduct marathi news)
मनपा आयुक्तांच्या परिषद दालनात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. श्री. जाधव यांनी शहरातील सर्व राजकीय पक्ष, पक्षाचे नेते, विविध पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ चे आदर्श आचारसंहितेचे पालन करुन हा निवडणुकीचा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडावा, असे आवाहन केले.
आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी व लोकसभा निवडणुकीचे इतर कामकाजाकरीता आचारसंहिता अंमलबजावणी अधिकारी म्हणून उपायुक्त गणेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनपा क्षेत्रातील आजपर्यंत १ हजार ६५६ बॅनर, झेंडे, फ्लेक्स जमा करण्यात आले आहेत.
बैठकीत विभागप्रमुखांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवितानाच त्या संबंधातील आदेश देण्यात आले. जाखोट्या भवन, मुख्य अग्निशमन केंद्र येथे ‘आचारसंहिता नियंत्रण कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष २४ तास सुरु असेल. या कक्षासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. . (latest marathi news)
बैठकीस मुख्य लेखापरीक्षक शबाना शाह, उपायुक्त गणेश शिंदे, हेमलता डगळे, लेखाधिकारी राजू खैरनार, सहाय्यक आयुक्त अनिल पारखे, सचिन महाले, हरिश डिंबर, शाम बुरकूल, शहर अभियंता कैलास बच्छाव, आरोग्याधिकारी डॉ. जयश्री आहेर, लेखापरिक्षक शेखर वैद्य, मुख्य अग्निशमन अधिकारी डॉ. संजय पवार, नगरसचिव साजीद अन्सारी, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, उपअभियंता शांताराम चौरे,
सचिन माळवाळ, प्रभाग अधिकारी सचिन भामरे, इरफान मोहम्मद अश्रफ, विद्युत अधिक्षक अभिजीत पवार, संतोष गायकवाड, भरत सावकार, रमाकांत धामणे, निलेश पाटील, निवडणूक कक्ष प्रमुख अनिल कोठावदे, आस्थापना पर्यवेक्षक निलेश जाधव, प्रमुख स्वच्छता निरीक्षक एकबाल अहमद, आनंदसिंग पाटील, लिपिक इम्तियाज सोहेल आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
रस्ते, चौकांनी घेतला मोकळा श्वास
शहरातील सर्व प्रमुख चौक, रस्त्यांवर विक्रमी संख्येने बॅनर, पोस्टर, फ्लेक्स लावलेले आढळून येत होते. आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु झाल्यापासून निवड, यश, नियुक्ती व धार्मिक कार्यक्रम वगळता राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे फलक चौक, रस्त्यातून गायब झाल्याने रस्ते व चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.