Hemant Godse  esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : खासदार गोडसेंना पुन्हा मिळणार नोटीस!

Lok Sabha Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये बॅगा भरून पैसे आणल्याचा आरोप होत असताना आता महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्याही अडचणीत वाढ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये बॅगा भरून पैसे आणल्याचा आरोप होत असताना आता महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्याही अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये घेतलेल्या सभेचा खर्च का सादर केला नाही म्हणून निवडणूक खर्च निरीक्षकांनी त्यांना नोटीस बजावण्याची शिफारस जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे केली आहे.

नाशिकमधील व्यावसायिक, धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी रविवारी (ता. १२) संवाद साधला. त्याचा खर्च हेमंत गोडसे यांनी सादर करणे अपेक्षित असताना तो पक्षाचा कार्यक्रम असल्याचे त्यांनी भासवले. परंतु मुख्यमंत्र्यांनी प्रचारसभाच घेतल्याचे खर्च निरीक्षकांनी म्हटले आहे. त्यावरून हा मुद्दा उपस्थित झाला आहे.

खर्च निरीक्षकांनी मंगळवारी (ता. १४) सर्व उमेदवारांची द्वितीय तपासणी केली. त्यासाठी नाशिक मतदारसंघातून ३१ पैकी २९ उमेदवारंनी हजेरी लावली. या खर्चात तफावत आढळलेल्या उमेदवारांना सुधारित अहवाल सादर करण्याची सूचना निरीक्षकांनी केली. गैरहजर राहिलेल्या भाग्यश्री अडसूळ (इंडियन पीपल्स अधिकार पक्ष) आणि कैलास चव्हाण यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

दुसऱ्या खर्च तपासणी खर्चात हेमंत गोडसे अग्रस्थानी असून, त्याखालोखाल राजाभाऊ वाजेंनी खर्च केल्याचे तर तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष असलेले स्वामी सिद्धेश्वरानंद सरस्वती आले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांची निवडणूक खर्चाची तपासणी खर्च निरीक्षक प्रवीण चंद्रा व सागर श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे झाली. (latest marathi news)

तपासणीनंतर उमेदवारांच्या खर्चाची दैनंदिन नोंदवही निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहे. आता तिसरी खर्च तपासणी १८ मेस शासकीय विश्रामगृह ‘शिवनेरी’, नाशिक येथे होणार आहे.

नाशिक लोकसभा उमेदवार खर्च

हेमंत गोडसे : ४४ लाख ७३ हजार

राजाभाऊ वाजे : ३४ लाख ३० हजार

सिद्धेश्वरानंद महाराज : १६ लाख ३९ हजार

शांतिगिरी महाराज : दहा लाख १६ हजार

करण गायकर : पाच लाख ३९ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT