Notice  esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : निवडणूक प्रशिक्षणास दांडी! जिल्ह्यात 52 निरीक्षकांना नोटिसा

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत संवेदनशील मतदान केंद्रावर सूक्ष्म निरीक्षक म्हणून नियुक्त कर्मचाऱ्यांना जिल्हा निवडणूक विभागातर्फे प्रशिक्षण देण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत संवेदनशील मतदान केंद्रावर सूक्ष्म निरीक्षक म्हणून नियुक्त कर्मचाऱ्यांना जिल्हा निवडणूक विभागातर्फे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणास दांडी मारलेल्या जिल्ह्यातील ५२ कर्मचाऱ्यांना निवडणूक विभागाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. नाशिक, दिंडोरी व धुळे लोकसभा मतदारसंघांसाठी २० मेस मतदान होणार आहे. ()

त्यादृष्टीने जिल्ह्यातील चार हजार ८०० मतदान केंद्रांवर ३० हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यात एलआयसी व शासकीय बँकेच्या ६२० कर्मचाऱ्यांवर संवेदनशील मतदान केंद्राचे सूक्ष्म निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक विभागाने त्यांच्यासाठी मंगळवारी (ता. २३) महाकवी कालिदास कलामंदिरात सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत प्रशिक्षण आयोजित केले होते.

निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, दिंडोरीचे प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी मार्गदर्शन केले. लोकसभा निवडणुकीत अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासन व जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील २२ संवेदनशील केंद्रांची घोषणा करण्यात आली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात १९, तर दिंडोरीत अवघे तीनच मतदारसंघ संवेदनशील आहेत.

कोणत्याही व्यक्तीकडून आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, यादृष्टीने सूक्ष्म निरीक्षकांवर अगदी बारकाईने लक्ष ठेवण्याची जबाबदारी आहे. तेथील घटनांची माहिती तातडीने आपल्या वरिष्ठांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचेल, यादृष्टीने प्रयत्न करावा. समयसूचकता राखून एखादा निर्णय घेण्याची जबाबदारी या सूक्ष्म निरीक्षकांना पार पाडावी लागणार आहे. (latest marathi news)

मतदान केंद्राबाहेर सूक्ष्म निरीक्षक म्हणून त्यांची जबाबदारी महत्त्वपूर्ण असल्याने त्यांच्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने स्वतंत्ररीत्या प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणास जिल्ह्यातील ५२ कर्मचाऱ्यांनी दांडी मारली असून, त्यांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. त्यांच्याकडून उत्तर प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

विधानसभानिहाय अनुपस्थित कर्मचारी

नांदगाव- २, मालेगाव मध्य- २, मालेगाव बाह्य- ६, बागलाण- २, कळवण- ६, चांदवड- ५, येवला- ६, सिन्नर- ४, निफाड- २, दिंडोरी- ३, नाशिक पूर्व- २, नाशिक मध्य- ३, नाशिक पश्‍चिम- १, देवळाली- २, इगतपुरी- ४.

''संवेदनशील मतदान केंद्रांवर निरीक्षक म्हणून सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे महत्त्वपूर्ण प्रशिक्षण नाशिकमध्ये पार पडले. या वेळी अनुपस्थित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या असून, त्यांच्याकडून खुलासा प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल.''- डॉ. शशिकांत मंगरुळे, उपजिल्हाधिकारी (जिल्हा निवडणूक विभाग)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: “आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणीच्या खात्यात जमा होतील”; CM शिंदेंची घोषणा

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Champions Trophy 2025: झुकेगा नहीं साला... म्हणत होते, पण BCCI समोर पाकिस्तानची शरणागती, भारताचे सामने 'या' देशात

Raj Thackeray: मुल्ला मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढताहेत, राज ठाकरेंचा आरोप! पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काढला फतवा

Aditya Thackeray: सत्तेत आल्यास पहिला निर्णय शेतक-यांच्या कर्जमाफीचा! आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT