Lok Sabha Election 2024  esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : उत्तर महाराष्ट्रात दीड कोटी मतदार, 15 हजार मतदान केंद्रे

Lok Sabha Election : नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांमध्ये एकूण आठ लोकसभा मतदारसंघ असून, एक कोटी ५२ लाख ४५ हजार ५६८ मतदार आहेत.

हर्षवर्धन बोऱ्हाडे : सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांमध्ये एकूण आठ लोकसभा मतदारसंघ असून, एक कोटी ५२ लाख ४५ हजार ५६८ मतदार आहेत. प्रशासकीय पातळीवर निवडणुकीची तयारी वेगाने सुरू असली तरी सध्या मतदार नोंदणी सुरू असल्याचे महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी कळवले आहे. उत्तर महाराष्ट्रात एकूण आठ लोकसभा मतदारसंघ असून, त्यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर, दिंडोरी, नाशिक, अहमदनगर आणि शिर्डी या आठ लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. (Nashik Lok Sabha Election One crore voters in North Maharashtra marathi news)

प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून, ४८ विधानसभा मतदारसंघ आठ लोकसभेमध्ये समाविष्ट झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल होईपर्यंत मतदार नोंदणी ही अविरत चालणारी प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. नंदुरबार मतदारसंघ राखीव आहे. त्यात दोन हजार ११५ मतदान केंद्रे असून, १९ लाख ६१ हजार ८९३ मतदार या मतदारसंघात नोंदविले आहेत.

धुळे लोकसभा मतदारसंघात एक हजार ९६९ मतदान केंद्रे असून, २० लाख चार हजार ३५४ मतदारांनी नोंदणी केली आहे. जळगावात एक हजार ९८२ मतदान केंद्रे असून, १९ लाख ८२ हजार ३१० मतदारांनी नोंदणी केली आहे. रावेरमध्ये एक हजार ९०४ मतदान केंद्रे असून, १८ लाख १२ हजार १५७ मतदार नोंदविण्यात आले आहेत.  (latest marathi news)

दिंडोरी मतदारसंघ एसटी प्रवर्गसाठी राखीव असून, एक हजार ९२२ मतदान केंद्रे समाविष्ट आहेत. १८ लाख ४२ हजार ९०७ मतदारांनी नोंदणी केली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण एक हजार ९१० मतदान केंद्रे असून, २० लाख चार हजार १९६ मतदारांनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्रात सर्वांत मोठ्या क्षेत्रफळाचा ओळखला जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात दोन हजार २६ मतदान केंद्रे असून, १९ लाख ६९ हजार ३४९ मतदारांनी नोंदणी केली आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघही एसटी प्रवर्गासाठी राखीव असून, या मतदारसंघात एक हजार ७०८ मतदान केंद्रे आहेत, तर १६ लाख ६८ हजार ४०२ मतदारांनी नोंदणी केली आहे. उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांत एकूण १५ हजार ५३६ मतदान केंद्रे असून, एक कोटी ५२ लाख ४५ हजार ५६८ मतदारांनी नोंदणी केली आहे. यामध्ये स्री आणि पुरुषांचे मतदार नोंदणीचे प्रमाण निम्म्यास निम्मे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Maratha Reservation: सरकारमुळेच माझ्या मुलाचा जीव गेला; आरक्षणासाठी जीव देणाऱ्या प्रतिकच्या आईचा जरांगेंसमोर टाहो

A Unique Hat trick: ऑस्ट्रेलियन फिरकीपटूची अनोखी हॅटट्रिक; ३६ वर्षांपूर्वी कर्टनी वॉल्श यांनी केली होती अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT